Post Office Franchise in Marathi | पोस्टाची फ्रँचायजी घ्या आणि कमवा बक्कळ पैसा.. असा करा अर्ज..

Post Office Franchise

Post Office Franchise in Marathi: या आधुनिक काळात भरपूर तंत्रज्ञान विकसित झाले. तसेच माणूस देखील प्रगतशील झाला आहे. परंतु, तरी देखील आजही पोस्ट ऑफिसला फार महत्व आहे. सामान्य नागरिकांना परवडणारे पोस्ट ऑफिसची सुविधा. पोस्ट ऑफिस विविध प्रकारच्या सुविधा देते. संदेश, पत्रं, भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी आजही पोस्ट ऑफिस सुरक्षित आहे.

या आधुनिक काळात पोस्ट विभागाने कात टाकलीय.. नागरिकांच्या बदलत्या गरजा क्षात घेऊन पोस्ट विभागाने नवनवीन सोयी-सुविधा सुरु केल्या आहेत. अगदी गुंतवणूक क्षेत्रातही पोस्ट ऑफिस उतरलेलं आहे. देशातील नागरिक एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाचा विचार केला जातो. ‘Post Office Franchise’

पोस्टाच्या अनेक गुंतवणुक योजनांतून नागरिकांचा चांगला फायदाही होतांना दिसत आहे. कारण, पोस्टात अगदी थोडीसी गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळतो. आता तुम्हाला पोस्ट ऑफिस कमाई करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. (Post Office Franchise Scheme)

पोस्ट ऑफिस तुम्हाला कमविण्याची संधी देत आहे. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घ्यावी लागेल. या पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी द्वारे तुम्ही चांगली कमाई करू शकाल. पोस्ट ऑफिस फ्रँचायजीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Post Office Franchise Income)

पोस्ट ऑफिस फ्रँचायजी


देशात पोस्टाच्या तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त शाखा आहेत. परंतु, तरी देखील पोस्टाच्या कामाचा ताण कमी नाही झाला. कारण पोस्टाची कामे वाढली आहे. यामुळे आणखी काही नव्या शाखा सुरु करण्याची गरज आहे. तर यामुळे तुम्हाला पोस्टाची फ्रॅंचायजी घेता येईल. ही फ्रॅंचायजीसुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये लागतात.

पोस्ट ऑफिस फ्रँचायजी पात्रता Post Office Franchise


फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे.
भारताचा कोणताही नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकतो.
कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिस फ्रँचायजी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणापत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणापत्र (Post Office Franchise Form)

पोस्ट ऑफिस फ्रँचायजीसाठी असा करा अर्ज.. Post Office Franchise


सर्वप्रथम https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/IndiaPostHome.aspx या वेबसाईटवर जा.
आता ‘Requirement’ मध्ये Franchise Scheme Details पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
यानंतर ॲप्लिकेशन कम फ्रॅन्चायजी आउटलेट ॲग्रीमेंट फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या.
हा फॉर्म व्यवस्थितपणे भरून व आवश्यक कागदपत्रे जोडून पोस्ट ऑफिसच्या अधिक्षकाकडे सबमिट करा.

👉👉 येथे क्लिक करा 👈👈


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment