Police Bharti 2022: राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर आहे. राज्यात लवकरच तब्बल 11,443 जागांसाठी पोलिसांची भरती केली जाणार आहे. राज्य पोलिस दलातील रिक्त 100 टक्के पदे भरतीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा ‘जीआर’ काढण्यात आला आहे. राज्यातील पोलिस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. (Police Bharti 2022 Maharashtra)
दरम्यान, राज्यात ठाकरे सरकारने असताना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात दोन टप्प्यात पोलिस भरती करणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार, पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती पूर्ण केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7231 पदांसाठीची भरती केली जाणार होती.. परंतु, नंतर सत्तांतर झाल्याने ही प्रक्रिया रखडली गेली. (Police Bharti 2022)
महाविकास आघाडी सरकारनेही पोलिस भरतीबाबत अनेकदा घोषणा केली होती. तसेच सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील औरंगाबाद दौऱ्यातील एका कार्यक्रमानिमित्त आपल्या भाषणात पोलिस भरतीची 7231 पदांसाठी पोलिस भरती केल्या जाईल अशी घोषणा केली होती. परंतु, अजूनपर्यंत फक्त घोषणाबाजी चालूच आहे. आता काढलेल्या नवीन शासन निर्णयांमध्ये काय दिले जाणून घेऊ या..
पोलिस भरती शासन निर्णय Police Bharti 2022
पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक व सशस्त्र पोलिस शिपाई, अशी एकूण 11 हजार 443 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ‘एमपीएससी’मार्फत (MPSC) पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
2021 मध्ये राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई गट ‘क’ या संवर्गातील पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक व सशस्त्र पोलिस शिपायांची 11,443 पदे रिक्त झाली होती. ही रिक्त पदे 100 टक्के भरली जाणार आहेत.. कोणतीही नवीन पद भरली जाणार असून, मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदे भरणार असल्याचे ‘जीआर’मध्ये दिलेलं आहे. (Police Bharti 2022 Date Maharashtra)
Police Bharti GR राज्यातील पोलिस भरती करणाऱ्या व बेरोजगार तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Police Bharti Recruitment) कारण राज्यात तब्बल 11,443 जागांसाठी पोलिस भरती होणार आहे. ही माहिती तरुणांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून, ही माहिती पुढे नक्की शेअर करा.
हे देखील वाचा-
- शेतकऱ्यांनो शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ
- शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला नुकसान भरपाई मिळणार, 3600 कोटी निधी मंजूर.
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा