प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम २०२३. PMEGP अंतर्गत मिळणार तरुणांना १० ते २५ लाखांपर्यंत अनुदान!

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

सरकार शेतकरी आणि जोड व्यवसाय यांच्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहे. भारतातील ग्रामीण भाग शेतीवर अवलंबून राहत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी नवनवीन योजना सरकार राबवत आहे. जेणेकरून त्यांचं सक्षमीकरण व्हावं. कारण देशाचा विकास हा ग्रामीण आणि शहरी भागावर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेचा विकास हा आर्थिक सक्षीकरणावर अवलंबून असतो. म्हणून आज वाढती बेरोजगारी देशाची अर्थव्यवस्था कमजोर करत आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारी दूर व्हावी म्हणून नवीन योजना अमलात आणली आहे. PMEGP योजना म्हणजे Prime Minister Employment Generation Programme.

सरकार देशातील नागरिकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध रोजगार संबंधित योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना किमान वेतनाचा लाभ प्रदान करण्यात यावा असा हेतू आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी कायमस्वरूपी रोजगारच्या संधी निर्माण होतील असे शासनाव्दारे प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच या विविध योजनांच्या माध्यमातून देशाची किंवा राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि एकूण बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असते.

PMEGP योजना या योजनेला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे देखील म्हणतात. या योजनेला व्यवसाय कर्ज योजना म्हणतात कारण या योजनेच्या माध्यमातून सरकार नागरिकांना स्वतःच व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. या
योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणारे कर्ज अत्यंत कमी व्याजदरावर उपलब्ध करून दिल्या जाते आणि या कर्जाचा परतफेडीचा कालावधी ३ वर्ष ते ७ वर्ष असा असतो. तसेच या PMEGP लोन योजना 2023 अंतर्गतउपलब्ध करून देण्यात येणाऱ्या व्यवसाय कर्जाची विशेषता म्हणजे, नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून सरकारकडून 35 टक्के सबसिडी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येते.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment