PM Ujjwala Yojana Subsidy Check | तुम्हाला 200 रुपयांची गॅस सबसिडी मिळते का? ‘असं’ चेक करा.. नसेल मिळत तर अशी करा तक्रार..

Gas Subsidy Check Online: घरगुती गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघाडले होते. यामुळे मोदी सरकारने 21 मे 2022 रोजी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना हे अनुदान मिळत आहे. ही सबसिडी वर्षाला 12 सिलिंडरवर देण्यात येत आहे.

आर्थिक परिस्थितीनुसार दुर्बल घटकातील लोकांना ही गॅस सबसिडी मिळते. तसेच, पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी असल्यास सबसिडी दिली जात होती. याअगोदर भरपूर दिवस घरगुती सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद केली होती. या अनुदानामुळे सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. (PM Ujjwala Yojana in Marathi)

मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यामुळे घरगुती गॅससाठी सर्वसामान्य नागरिकांना 1000 ते 1100 रुपये द्यावे लागत होते. यामुळे नागरिकांमध्ये सरकारबद्दल विरोध वाढल्याने मोदी सरकारने पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर ही सबसिडी तुम्हाला मिळते का नाही कसं चेक करायचा जाणून घेऊ या..

सबसिडी अशी चेक करा..

  • सर्वप्रथम http://mylpg.in/ अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
  • स्क्रिनच्या डाव्या बाजूला तुमचा ज्या कंपनीचा सिलिंडर गॅस आहे ती कंपनी निवडा.
  • साईन इन करण्यापूर्वी नवीन युजर ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमचा आयडी असेल तर साईन इन करा. (PM Ujjwala Yojana Subsidy Check)
  • तुमचा आयडी नसेल तर नवीन बनवून घ्या.
  • तुमच्या नोंदणीवर ‘सिलिंडर बुकींग पाहा’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमची गॅस सिलिंडर संख्या व सबसिडी तपशील पाहा.
  • गॅस सिलिंडरवर तुम्हाला सबसिडी मिळालेली नसेल, तर फिडबॅक बटणावर क्लिक करा.
  • गॅस सिलिंडरवर तुम्हाला सबसिडी मिळालेली नसेल, तर फिडबॅक बटणावर क्लिक करा.

सबसिडी मिळत नसेल, तर अशी करा तक्रार वरीलप्रमाणे सांगितलेल्या नुसार, तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळालेली नसेल, तर फिडबॅक बटणावर क्लिक करा. येथे सिलिंडरवर सबसिडी मिळालेली नाही, असा फिडबॅक देऊन तक्रार करू शकता. तसेच तुम्ही 18002333555 या टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता..

Sharing Is Caring:

Leave a Comment