PM Aawas Yojana List: पंतप्रधान आवास योजना.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना महत्वकांक्षी ठरली आहे. देशातील प्रत्येक सामान्य नागरिकांचे हक्काचं घर असावे, यासाठी मोदी सरकारने 1 एप्रिल 2016 पासून पंतप्रधान आवास योजना सुरु केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून दिली जाणार आहेत. असे मोदी सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यातील 1.73 कोटी घरे पूर्ण झाली आहेत. या ग्रामीण गृहनिर्माण योजनेतून लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी हप्त्या-हप्त्याने अनुदान दिले जाते.. (PM Aawas Yojana Maharashtra)
पीएम आवास योजनेअंतर्गत गरजू कुंटुंबाला हक्काच्या घराची सोय करुन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. ही योजना गरजू कुटुंबासाठी महत्वाकांक्षी ठरली आहे. (PM Awas Yojana List 2022 Maharashtra)
पीएम आवास योजनेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पीएम आवास योजना-(ग्रामीण)- 2022-23 अंतर्गत लाभार्थ्यांची नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुमचं नाव या यादीत आहे की नाही, हे तुम्हाला घरबसल्या तपासता येईल. तर पीएम आवास योजनेची लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या.. (PM Awas Yojana List 2022 Gramin)
अशी पहा पीएम आवास योजनेची यादी.. PM Aawas Yojana
- सर्वप्रथम पीएम आवास योजनेच्या https://pmayg.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा..
- वेबसाईटवरील होमपेजवर सर्वात वर तुम्हाला ‘Awaassoft’ दिसेल, त्या बटणावर क्लिक करा.
- यानंतर निवास बटणावर क्लिक करा, नंतर ‘रिपोर्ट’वर क्लिक करा. (Gharkul Yadi 2022)
- आता एका नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- यानंतर ‘सत्यापनासाठी लाभार्थी तपशील’ फॉर्मवर क्लिक करा. (PM Awas Yojana List)
- यानंतर अर्ज ओपन होईल. तुमचे राज्य, पंचायत, उपविभाग तपशील, वर्ष निवडा, कॅप्चा कोड भरा.
- सर्व माहिती भरल्यानंतर, सबमिट बटणावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर पीएम आवास योजनेची संपूर्ण यादी ओपन होईल. या यादीमध्ये तुमचे नाव पाहू शकता.
पीएम आवास योजनेची लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेद्वारे प्रमाणित केली जाते. या शिवाय तुम्ही ‘एमआयए-आवास सॉफ्ट’ आणि ‘आवास’ ॲपद्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकाल. तसेच तुम्ही या ॲपद्वारे नवीन घरकुल यादी देखील बघू शकता.
3 thoughts on “PM Aawas Yojana पीएम आवास योजना लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर, असे पहा यादीत नाव..”