Maharashtra Police Bharti 2022: राज्यात अनेक दिवसांपासून नोकर भरती रखडलेली असल्याने तरुण मंडळी त्रासून गेले आहेत. परंतु, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यात लवकरच सुमारे साडे सात हजार पोलिसांची भरती होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. संभाजी नगर (औरंगाबाद) दौऱ्यातील एका कार्यक्रमानिमित्त भाषणात मुख्यमंत्र्यांनी पोलिस भरती होणार असल्याची घोषणा केली…
या अगोदर महाविकास आघाडी सरकारने देखील पोलिस भरतीबाबत घोषणा केल्यात.. यामध्ये सत्तांतर झाले.. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांची निवड झाली. या सरकारने लोकप्रिय घोषणांचा धडाका लावला आहे.. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा राज्याचा दौरा करीत आहे. 30 व 31 जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाजी नगरचा दौरा केला.
Maharashtra Police Bharti 2022
संभाजी नगर शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले. या पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी तिथे अनेक पोलिस भरतीची तयारी करणारे तरुण मंडळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहून तरुणांनी ‘पोलिस भरती’ची घोषणाबाजी सुरू केली.. (Police Recruitment)
तरुणांकडून मोठ्याने ‘पोलिस भरती’ची घोषणा होऊ लागली. ही घोषणाबाजी पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील काही महिन्यातच राज्यात तब्बल साडे सात हजार पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा ऐकून तरुणांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा व राज्यातील विविध विकासकामांच्या घोषणा केल्या.
ठाकरे सरकारकडूनही Maharashtra Police Bharti 2022 घोषणा
दरम्यान, राज्यात ठाकरे सरकार असताना, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात पोलिस भरती दोन टप्प्यांत करणार असल्याची घोषणा केली होती. या मधील पहिल्या टप्प्यातील 5 हजार पोलिसांची भरती पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यात 7231 जागांसाठी भरती केली जाणार होती.. परंतु, नंतर सत्तांतर झाल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती.. (Police Bharti 2022 GR)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी नगर दौऱ्यात राहिलेली पोलिस भरती करण्याची घोषणा केल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात 7231 जागांसाठी पोलिस भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.. अजून पोलिस भरती संबंधित काही अपडेट आल्यास नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू.
हे देखील वाचा-
- DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षेशिवाय होणार निवड
- भारतीय डाक विभागात भरती Post Office Recruitment 75,600 रुपयांपर्यंत नोकरी करण्याची मोठी संधी
- HDFC बँकेत 12552+ रिक्त जागांसाठी भरती सुरू; पगार 1,74,400/-