C.I.D (गुन्हा अन्वेषण) वर कोणती जबाबदारी असते व त्यातील अधिकारी कसे निवडतात?

गुन्हा अन्वेषणचे खाते हे राज्याच्या पोलीस महानिरीक्षक (I.G.P.) च्या अधिकाराखाली असते. सदर खात्यात पोलीस अधीक्षक व उप अधीक्षक (S. P. Dy. S. P.) च्या हुद्याचे अधिकारी राज्य सरकार निवडते. तर त्यात काम करण्यासाठी पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (Inspector व Sub Insp.) यांची निवड पोलीस महानिरीक्षक (I.G.P.) यांच्याकडून निवड केली जाते. C.I.D. (गुन्हा अन्वेषण) वर खालील जबाबदाऱ्या दिलेल्या असतात.

१) राजकीय, जातीय वा तत्सम बाबतीतील राज्यभरातील माहिती गोळा करणे.

२) राज्यातील सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर ताबा मिळवणे.

३) सराईत गुन्हेगारी वा विशेष गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या

शस्त्रांची व कार्यपद्धतीची माहिती मिळवणे.

४) अवघड व महत्त्वाच्या बाबतीतील गुन्ह्यांचे अन्वेषण करणे.

५) गुन्हेगारी टोळ्यांची माहिती मिळवणे.

६) गुन्ह्यांची माहिती ठेवून आंतरराज्य, आंतरजिल्हा सदर गुन्हेगारांची व त्यांची सद्यस्थितीतील माहिती पोलीसखात्यास पुरवणे.

Sharing Is Caring:

Leave a Comment