Gratuity Money | नोकरदारांना ग्रॅच्युइटीचे पैसे 5 वर्षांपूर्वी मिळतात, त्यासाठी असा करा क्लेम

Gratuity Money
Gratuity Money

Gratuity Money: तुम्ही एखाद्या संस्थेत सतत 5 वर्षे काम केले तर तुम्हाला ग्रॅच्युएटीचा लाभ दिला जातो. कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्त झाला किंवा कोणत्याही कारणाने 5 वर्षांनंतर नोकरी सोडल्यास व तो ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले, तर हा लाभ दिल्या जातो.

ग्रॅच्युइटी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले की, कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिलं जाणारं एक प्रकारचं बक्षीस आहे. कर्मचार्‍यांच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा छोटासा भाग कापला जातो, परंतु कंपनीचा त्यात मोठा भाग असतो. अशाप्रकारे ग्रॅच्युइटीची व्याख्या आहे.

gratuity act 1972 in marathi ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972
ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972 नुसार एखाद्या कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला किंवा अपघातात तो अपंग झाला तर त्याच्यासाठी 5 वर्षाचा नियम लागू होत नाही. ग्रॅच्युइटीची संपूर्ण रक्कम अशा कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या नॉमिनींना दिली जाते. जर एखाद्याने ग्रॅच्युइटीसाठी नॉमिनेट केले नसेल तर हे पैसे वारसदाराला दिले जाते.

My Gratuity Money एखाद्या कर्मचाऱ्याने 4 वर्षं, 10 महिने आणि 11 दिवस सलग एकाच कंपनीत काम केलं आणि त्यानंतर नोकरी सोडली, तर त्याला ग्रॅच्युइटी देय होते. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सलग 5 वर्षं एकाच कंपनीत नोकरी केल्यानंतर कोणताही कर्मचारी ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरत असतो.

पेमेंटचा नियम
नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात होऊन अपंग किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या ग्रॅच्युइटी खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते. अशा परिस्थितीत किमान 5 वर्षांच्या नोकरीची अट लागू होत नाही. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मिळणारी ही रक्कम नोकरी कालावधीवर अवलंबून असते. ही रक्कम जास्तीत जास्त 20 लाख रुपये असते.

या सूत्राने पैसे दिले जातात
कोणत्याही कर्मचाऱ्याला कमाल 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युइटीची रक्कम मिळू शकते. ग्रॅच्युइटीची रक्कम निश्चित करण्यासाठी एक सोपी पद्धत वापरली जाते. या पद्धतीच्या मदतीनं ग्रॅच्युइटीची रक्कम समजू शकते. ही पद्धत खाली देण्यात आली आहे. gratuity money after 5 years

gratuity calculator formula सूत्र
एकूण ग्रॅच्युइटीची रक्कम = (एकूण वेतन) × (15/26) × (कंपनीत किती वर्षं काम केलं तो कालावधी)

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत 20 वर्षे काम केले त्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 700 रुपये आहे. येथे महिन्यातून फक्त 26 दिवस मोजावे लागतात. कारण 4 दिवस यामध्ये सुट्टी आहे. ग्रॅच्युइटीची गणना एका वर्षात 15 दिवसांच्या आधारावर केली जाते.

ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम = (70000) × (15/26) × (20) = 8,07,692 रुपये असेल.

अशाप्रकारे तुम्ही तुमची ग्रॅच्युइटी सुत्रांनुसार काढू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment