गावातील जमिनीचे सरकारी भाव कुठे आणि कसे पाहायचे.

नमस्कार मित्रांनो इन्फोमराठी या डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे इन्फोमराठी हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण घर बांधण्यासाठी, शेती करण्यासाठी जमीन घ्यायचा विचार करत असतो. शेती जमीन खरेदी करायचे म्हटल तर आपल्याला त्या भागातील जमिनीचा सरकारी दर माहित असण गरजेच असत. या विषयीची सगळी माहिती आपल्या या लेखातून आपल्याला मिळेल. आता सगळ डिजिटल झाल्यामुळे आपण घरबसल्या आपल्याला जी जमीन घ्यायची आहे त्या जमीनीचा सरकारी दर पाहू शकतो. आता आपण समजून घेऊयात कि कश्या पद्धतीने आपण जमिनीचे सरकारी दर पाहू शकतो.

  • यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे असलेल्या सर्चबार मध्ये igrmaharashtra.gov.in असे टाईप करायचे आहे.
  • असे केल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाची नोंदणी आणि मुद्रांक विभागाची वेबसाईट सुरु होईल.
  • ह्या वेबसाईटच्या डाव्या कोपऱ्यात महत्त्वाचे दुवे असा लिहलेली टॅब दिसेल त्यावर क्लिक करा मग आपल्यासमोर बरेचशे पर्याय दिसतील. त्यापैकी  मिळकत मूल्यांकन ह्या पर्यायावर क्लिक करा.
  • असे केल्यानंतर बाजारमूल्य दर पत्रक नावाचे एक नवीन पेज आपल्यासमोर येईल त्यावर महाराष्ट्राचा नकाशा असेल.
  • त्यानंतर आपल्याला ज्या जमिनीचा सरकारी भाव पहायचा आहे. तो जिल्हा निवडा. कोणत्या वर्षामध्ये जमिनीचा भाव किती होता ह्या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पाहिजे ते वर्ष निवडा. मग आपला तालुका नंतर गाव निवडा. गाव निवडल्यावर आपल्याला त्या गावातील जमिनीचे सरकारी भाव दिसू लागतील.
  • यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार च जमिनीचा सरकारी भाव दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी जमिनीचे देण्यात आलेलं मुल्य हे प्रतीहेक्टरनुसार असत. वरती दिलेल्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींचे सरकारी दर पाहू शकता.
  • जसे कि जिरायती जमीन, बागायती जमीन, एमआयडीसीच्या अंतर्गत येणारी जमीन, हायवेची जमिनी अशा प्रकारच्या जमिनीचे सरकारी दर आपण बघू शकता. आम्हाला आशा आहे कि गावातील “जमिनींचे सरकारी भाव” कसे आणि कुठे पाहायचे? हे आपल्याला समजले असेल.

आपल्याला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment