Gas Cylinder Price | गॅस सिलिंडराच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन दर

Gas Cylinder Price: marathikayda.com वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे.दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परंतु नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. दर महिन्याला आर्थिक क्षेत्राशी निगडीत बाबी मध्ये बदल होत असतो. गॅस सिलिंडर हजारांच्या पार गेलेला आहे. अनेकांचे लक्ष गॅस सिलिंडराचे दराकडे लागलेले असते. 1 ऑगस्ट रोजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले.

gas cylinder price
gas cylinder price

एलपीजी सिलिंडरच्या दरात 36 रुपयांची कपात करण्यात आली आहे. म्हणजेच, ही दर कपात व्यावसायिक गॅस सिलिंडराच्या किंमतीत करण्यात आली. 1 ऑगस्टपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2012.50 रुपयांऐवजी 1976.50 रुपये करण्यात आली आहे.. यामुळे इतर गोष्टी देखील स्वस्त होतील.. जसे, हॉटेलिंग स्वस्त होण्याची शक्यता आहे..

घरगुती सिलिंडरचे दर

भारतीय पेट्रोल कंपन्यांकडून घरगुती सिलिंडरच्या दरात सध्या कोणताही बदल केलेला नाही. मुंबईत घरगुती सिलिंडरसाठी 1052 रुपये, तर दिल्लीत 1053 रुपये मोजावे लागत आहेत. भारतात इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.. यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडराच्या दरात जुलै महिन्यात 8.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. यामुळे मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1972.50 रुपये, दिल्लीत 2012.50 रुपये, चेन्नईत 2177.50 रुपये, तर कोलकत्यात 2132 रुपये झाली होती. (Gas Cylinder News)

6 जुलै 2022 रोजी घरगुती गॅस सिलिंडराच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली होती. तसेच 7 मे रोजी सिलिंडरचे किंमतीत पुन्हा 50 रुपयांनी वाढ केली होती. याशिवाय, 22 मार्चला ही घरगुती गॅस सिलिंडराच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Sheli Palan Yojana 2022: महाराष्ट्र शेळी पालन योजना, पात्रता, अर्ज कसा करावा जाणून घ्या

Gas Cylinder Price

ग्राहकांना या अगोदर दरवर्षी 12 सिलिंडरवर ही सबसिडी मिळायची. परंतु, नंतर कोरोना काळात ही सबसिडी कमी करण्यात आली. सरकारने नंतर काही दिवसांनी  कोरोनाच्या काळात पूर्णपणे हे अनुदान बंद करून टाकले. आता फक्त पीएम उज्ज्वला योजनेतंर्गत ज्यांनी घरगुती गॅस सिलिंडर कनेक्शन घेतले आहे त्यांनाच सबसिडी दिल्या जात आहे. पीएम उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 200 रुपये सबसिडी दिल्या जात आहे.

गेल्या या 8 वर्षांमध्ये ‘एलपीजी’ सिलिंडरच्या दरात तब्बल अडीच पटीने वाढ झालीय. ‘आयओसीएल’च्या दिलेल्या आकडेवारीनुसार मार्च 2014 मध्ये अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत फक्त 410 रुपये होती. यानंतर मार्च 2015 पासून घरगुती गॅस सिलिंडरची दिली जाणारी सबसिडी थेट बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली. (Gas Cylinder Price Today)

ग्राहकांना या अगोदर दरवर्षी 12 सिलिंडरवर ही सबसिडी मिळायची. परंतु, नंतर कोरोना काळात ही सबसिडी कमी करण्यात आली. सरकारने नंतर काही दिवसांनी कोरोनाच्या काळात पूर्णपणे हे अनुदान बंद करून टाकले. आता फक्त पीएम उज्ज्वला योजनेतंर्गत ज्यांनी घरगुती गॅस सिलिंडर कनेक्शन घेतले आहे त्यांनाच सबसिडी दिल्या जात आहे. पीएम उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 200 रुपये सबसिडी दिल्या जात आहे.

हे देखील वाचा-

Sharing Is Caring:

Leave a Comment