Ferfar Online Maharashtra: आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..

Ferfar Online Maharashtra : तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा इतिहास काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. (Ferfar Utara in Marathi Online) यामुळे हजारो-लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या जमिनीसाठी कोर्ट-कचेऱ्यांचे चक्कर मारावे लागतात.

Ferfar Online Maharashtra

तुम्हाला हे माहीतच असायला हवं की, खरेदीपूर्वी जमिनीचा मूळ मालक कोण? नंतर त्या जमिनीत काय बदल झाले. तर ही सर्व माहिती 1880 पासूनचे जुने सातबारा, फेरफार व खाते उताऱ्यावर मिळेल. आता 1880 सालापासूनचे जुने फेरफार उतारे तुम्हाला ऑनलाईन पाहता येईल.

फेरफार उतारे ऑनलाईन पाहण्याची सुविधा सध्या महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत पुरविली जात आहे. लवकरच ही सुविधा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सुरू केली जाणार आहे. तर ही सुविधा कोणत्या जिल्ह्यांत सुरू आहे ते जाणून घेऊ या.. (Satbara Online Maharashtra)

‘या’ 19 जिल्ह्यांत सुविधा सुरू.. Ferfar Online Maharashtra

अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, नंदूरबार, लातूर, मुंबई उपनगर, नाशिक, वाशिम, यवतमाळ, जळगाव या जिल्ह्यांत ही सुविधा सुरू आहे. (Land Record Maharashtra Online)

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा व खाते उतारे ऑनलाईन पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप बघा.

असे पहा 1880 सालापासूनचे उतारे.. Ferfar Online

  • घरबसल्या 1880 सालापासूनचे उतारे पाहण्यासाठी सर्वप्रथम https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जा.
  • या वेबसाईटवर आल्यानंतर, लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा आला असाल, तर ‘New User Registration’ पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती आणि पत्ता संबंधित माहिती विचारली जाईल. ही माहिती व्यस्त भरून सबमिट करा.
  • आता तुमचा लॉगिन आयडी तयार होईल. हा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या.
  • जुना फेरफार उतारा पाहण्यासाठी तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव व अभिलेखाचा प्रकार निवडून घ्या.
  • जो फेरफार उतारा तुम्हाला पाहायचा असेल तो निवडून घ्या. जसे, सातबारा व 8अ, फेरफार यामधील जो तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.
  • यानंतर तुमचा गट क्रमांक टाकून ‘Search’ बटणावर क्लिक करा. (Ferfar Online Maharashtra)
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात तुमच्या गट क्रमांकाशी संबंधित माहिती येईल.
  • येथे तुम्हाला कोणत्या वर्षाचा फेरफार उतारा पाहायचा ते वर्ष निवडा. तुमच्यासमोर फेरफार उतारा ओपन होईल.

हे देखील वाचा-

पीएम आवास योजना लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर, असे पहा यादीत नाव..

Sharing Is Caring:

84 thoughts on “Ferfar Online Maharashtra: आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..”

Leave a Comment