Farmer Buisness Idea : शेतीसोबत सुरु करा ‘हे’ 3 व्यवसाय; कमवा महिन्याला लाखों रुपये

Farmer Buisness Ideas
Farmer Buisness Ideas

Farmer Buisness Ideas : भारतात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. देशातील अनेक नागरिक ग्रामीण भागात राहत असून शेतीवर अवलंबून आहेत. या शेतीद्वारे उत्पन्न घेऊन अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने शेतीला फटका बसला आहे. कारण यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. तसेच उत्पन्न देखील जास्त होत नाही. यामुळे शेती करणं फायद्याचं ठरतं नाही.

शेती करणं परवडत नसल्यामुळे अशावेळी शेती करत असताना जोडधंदा करणं गरजेचं आहे. या जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तुम्ही देखील जोडधंदा करायचा विचार करायचा असेल तर आम्ही तुम्हाला शेतीशी निगडीत 3 व्यवसायाबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही आरामशीर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया शेतीशी संबंधित कोणते जोडधंदे करू शकता.

Farmer Buisness Ideas in Marathi

1) कोंबडीपालन किंवा कुक्कुटपालन (Poultry Farm) – भारतीय बाजारात अंडी आणि मांस याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे कोंबडीपालन किंवा पोल्ट्री फार्म हा व्यवसाय चांगला चालू शकतो. या व्यवसायातून तुम्हाला भरघोस कमाई होईल. 12 महिने अंडी व मांस याला प्रचंड मागणी असते. सरकार देखील हा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला सबसिडी दिली जात आहे. तसेच काही बॅंका कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे. कोंबडीपालन व्यवसाय तुम्ही शेती करत असताना करू शकता. agriculture buisness ideas in marathi

2) पिठाची गिरणी (Flour Mill) – पिठाची गिरणी आपल्या सर्वांना माहीतच आहे. या गिरणीला ग्रामीण भागात पिठाची चक्की देखील म्हणतात. गहू दळण्यासाठी किंवा इतर धान्य दळण्यासाठी पिठाची गिरणीची आवश्यकता असते. पिठाची गिरणीची आवश्यकता ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील असते. तुम्ही गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल तर तुम्ही पिठाची गिरणी घेऊन चांगली कमाई करू शकता.

हा व्यवसाय नेहमी काळ चालणारा आहे. कारण खाण्यासाठी पोळी लागणार आहे आणि त्यासाठी गहू दळायला पिठाची गिरणी लागणार आहे. तसेच तुम्ही पिठाच्या गिरणीवर गहू, तांदूळ, ज्वारी, दाळ दळून याला पॅकिंग करून बाजारात विकू शकता. शेतकरी हा व्यवसाय (Buisness Idea) शेती करत असताना सुरू करू शकतो. या व्यवसायासाठी सरकारकडून उद्यम योजनेमार्फत मदत केली जात आहे.

3) पशुपालन आणि डेअरी फार्म (Dairy Farm) – हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अतिशय सोपा आहे. कारण शेतकऱ्यांकडे थोड्या प्रमाणात गुरेढोरे असतात. यामुळे शेतकऱ्यांना पशुपालन आणि डेअरी फार्म व्यवसाय करणं काही एवढं अवघड नाही. देशात दुधाचा पुरवठा कमी होत असल्याने दुधाची मागणी वाढत आहे. शेतकरी ग्रामीण भागात राहत असतो. त्यामुळे शेतकरी हा व्यवसाय गावात सुरू करून बक्कळ पैसा कमवू शकता. यासाठी तुम्ही 10 ते 12 गायी, म्हशी घेऊन डेअरी फार्म व्यवसाय सुरू करू शकता. याचबरोबर तुम्हाला गाय व म्हशीचे गोबर देखील तुम्हाला शेतीसाठी कामी येईल. त्यामुळे पशुपालन आणि डेअरी फार्म व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment