Crop Loan Cibil Score: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्ज घेत असताना नेहमी आपल्या कानावर शब्द पडत असतो तो म्हणजे सिबिल स्कोअर.. हा शब्द ऐकला असून तुम्हाला याबाबत माहिती देखील असेल. या सिबिल स्कोअर बाबत महत्वाची अपडेट आली आहे. crop loan
आता शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट लावू नये, असा आदेश राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने (SLB) सर्व राष्ट्रीयकृत बँकांना व सहकारी बॅंकांना दिले आहे. सिबिल स्कोअरमुळे शेतकऱ्यांना अडवून धरू नये असेही एलसीबीने स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र, जो शेतकऱ्याची थकबाकी असल्याची पडताळणी करूनच कर्ज वाटप करावे अशी देखील सूचना देण्यात आली. cibil score for kcc loan
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांनी बॅंकेशी तडजोड करून कर्ज भरले. काही वेळा फायनान्स कंपन्या, पतसंस्था, नागरी बॅंकांकडून घेतलेले वाहन, गृहकर्ज थकबाकी राहिल्यामुळे किंवा उशिरा फेडल्यामुळे सिबिल स्कोअर कमी झालेला असतो.
सिबिल स्कोअर (CIBIL SCORE) कमी झाल्यामुळे अशा स्थितीत शेतकऱ्यांना कर्ज मिळणं शक्य नव्हते. यामुळे राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी याबाबतचे पत्र SLB ला पाठविले होते. तरी देखील काही बॅंका पीक कर्ज देताना सिबिलची सक्ती करत होते. Cibil Score for Agriculture Loan
परंतु, आता शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपावेळी सिबिल स्कोअर कमी असल्याचे कारण सांगून कोणत्याही बॅंकांनी पीक कर्ज देण्यास नकार देऊ नये, अशी सक्त सूचना एलसीबी कडून देण्यात आली आहे. (cibil score for crop loan) यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
सिबिल स्कोअर झिरो असला तरी मिळणार पीककर्ज
ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर झिरो किंवा मायन्स एक मध्ये असेल, अशा शेतकऱ्यांना बॅंकांनी लवकर कर्ज द्यावे. कारण अशा शेतकऱ्यांनी कोणाकडून कर्ज घेतल्या नसल्याने कर्ज देण्यासाठी कोणतीही अडचण नाही. पण मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी तडजोडीतून ओटीएस द्वारे कर्जाची परतफेड केली आहे, त्या शेतकऱ्यांना कर्ज देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी घेऊनच कर्ज द्यावे.
पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ची सक्ती बॅंकांनी करू नये
शेतकऱ्यांना पीक कर्ज (Crop Loan) घेताना सिबिल स्कोअरची अट लावू नये अशी सक्ती करू नये, अशी एलसीबीने कडक सूचना दिली आहे. परंतु, संबंधित कर्ज मागणारा व्यक्ती दुसऱ्या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा थकबाकीदार नसावा. अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना पीककर्ज दिल्या जाणार नाही.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.