Bank of Maharashtra Recruitment 2023 : बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विविध रिक्त पदांसाठी ही भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
बॅंक ऑफ महाराष्ट्र भरती 2023
या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्जासाठी फी, अर्जाची पद्धत, अर्ज पाठविण्याचा पत्ता अशी संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. (Bank Of Maharashtra Bharti 2023)
पदाचे नाव : अधिकारी (स्केल- 1 आणि स्केल- 2), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखिम अधिकारी
एकूण जागा : 416 जागा
शैक्षणिक पात्रता :
1) अधिकारी (स्केल- 1) – कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
2) अधिकारी (स्केल- 2) – कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
3) एजीएम – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून CS ची व्यावसायिक पात्रता. CA/ CFA/ CMA/ रिस्क मॅनेजमेंट/ फायनान्स/ यासारख्या अतिरिक्त पात्रतेसाठी विद्यापीठ/ संस्था/ शासनाने मान्यता दिलेल्या मंडळाकडून प्राधान्य दिले जाईल.
4) मुख्य व्यवस्थापक – (1) सर्व सेमीस्टर / वर्षांच्या एकूण किमान 50% सह आयटी/ कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदव्युत्तर बॅचलर अभियंता पदवी. ज्यांच्याकडे डेटा सायन्स/ डेटा ॲनालिटिक्स आणि एमबीए/ डिप्लोमा प्रमाणपत्रे या क्षेत्रातील प्रस्थापित संस्थांतील अतिरिक्त पात्रता / प्रमाणपत्र आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. (2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमए अर्थशास्त्र असणं आवश्यक आहे.
5) अर्थशास्त्रज्ञ : उमेदवाराने भारत सरकार किंवा तिच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सर्व सेमिस्टर/ वर्षाच्या एकूण किमान 60 टक्के गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
6) मेल प्रशासक : B.Tech/ B.E
7) उत्पादन समर्थक प्रशासक : B.Tech/ B.E
8) मुख्य डिजिटल अधिकारी : संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी/ एमसीए आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पात्रता.
9) मुख्य जोखमी अधिकारी : संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी/ एमसीए आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पात्रता.
पगार : 48,170 रुपये ते 1,00,380 रुपये
वयाची अट : 25 ते 60 वर्षे (पदांनुसार)
(SC/ST : 05 वर्षे व OBC : 03 वर्षे सूट)
अर्जासाठी फी : खुला / ओबीसी / EWS – 1180 रुपये
SC/ ST/ PwED – 118 रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेत होणाऱ्या नोकर भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचावी. ही माहिती इतरांना माहिती व्हावी यासाठी आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.