Anganwadi Bharti 2023 Maharashtra | अंगणवाडीत 20 हजार 186 जागांसाठी भरती होणार, या तारखेला होणार भरती प्रक्रिया सुरु

Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023: राज्यात सुमारे 20 हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक जागांसाठी भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अंगणवाडीत 100 टक्के महिलांची भरती केल्या जाते. महिलांना आपल्या गावातच नोकरीची संधी आहे. anganwadi bharti 2023 अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 जागांसाठी भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली असून, ही भरती सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. anganwadi bharti 2023 maharashtra या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

अंगणवाडी भरतीबाबत सध्या घोषणा करण्यात आलेली आहे. या भरतीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. anganwadi sevika bharti 2023 maharashtra ग्रामीण भागामध्ये सध्या बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणत वाढत चाललेली आहे. या भरतीमुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. अंगणवाडी भरतीबाबत माहिती जाणून घेऊ या..

Anganwadi Bharti अंगणवाडी भरती 2023 महाराष्ट्र
पदाचे नाव :
1) अंगणवाडी पर्यवेक्षक
2) अंगणवाडी मदतनीस
3) अंगणवाडी कार्यकर्ता

एकूण जागा : 20,186 जागा

शैक्षणिक पात्रता : (उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे) मूळ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज पद्धती : याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.

अर्ज करण्याची तारीख : अजून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

अधिकृत वेबसाईट : icds.gov.in

जाहिरात : अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ज्या दिवशी शासन स्तरावरून जाहिरात प्रसिद्ध होईल तसे आपल्या वेबसाईट वर कळवण्यात येईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment