Aapla Dawakhana Scheme: सरकार जनतेच्या भल्यासाठी व आरोग्यासाठी विविध सुविधा पुरवत आहे. त्याचप्रमाणे यासंबंधीच्या अनेक योजना सरकार राबवत असते. सरकार आता तुमचे आरोग्याची देखील काळजी घेत आहे. तुमचा उपचाराचा खर्च देखील सरकार करणार आहे.
महाराष्ट्र सरकारने खास आणि महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे. आता राज्य सरकार द्वारे आपला दवाखाना राज्यामध्ये विविध ठिकाणी चालू करण्यात येणार आहे. याचा उद्देश असा आहे की, गरिबापर्यंत उपचाराची सोय सुविधा पुरावा यासाठी आपला दवाखाना चालू करण्यात येणार आहे. ‘Aapla Dawakhana Yojana Maharashtra’
आपला दवाखाना ही शिंदे सरकारकडून योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आता दवाखान्याच्या उपचारासाठी खर्च करण्याची गरज नाही. आपला दवाखाना मोफत आहे, कोणत्याही प्रकारची फी नसून त्यामध्ये वैद्यकीय तपासणी मलमपट्टी अशा प्रकारच्या एकूण 147 चाचण्यांची सेवा आपला दवाखाना मध्ये मोफत आहे.
राज्यात 700 दवाखाने सुरू
आपला दवाखाना राज्यात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. राज्यात सध्या एकूण 700 आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. हा आपला दवाखाना झोपडपट्ट्यातील गरीब लोकांना व गरजू लोकांना उपयोगी पडणार आहे. या दवाखान्यामुळे कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नसून फ्री मध्ये तपासणी करता येते.
छत्रपती संभाजीनगर मध्ये 27 आपला दवाखाना सुरू करण्यात आलेले आहे. (aaplaa dawakhana list) राज्यात आपल्या दवाखाना ही संकल्पना जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून त्यामध्ये एकूण पंधरा ठिकाणी तालुक्यात सुद्धा आपला दवाखाना चालू होणार आहे. दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचा समावेश असणार आहे.
Government Scheme ग्रामीण भागात प्रामुख्याने बस स्थानकाजवळ ‘आपला दवाखाना’ (Aapla Dawakhana) सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे.आपला दवाखाना मध्ये टॅबच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा आणि वितरण, निदान केलेली पद्धती याचा तपशील नोंदवण्यात येईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.