Pik Vima 2023 : शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने अनेक मोठमोठे निर्णय घेतले. त्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पीक विमासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. जसं आपल्यासाठी विमा असतो, तसाच आता पिकांसाठी देखील विमा आहे. मागील हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले होते, या नुकसानपोटी शेतकऱ्यांना पीकविमा दिल्या गेला होता.
राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विविध योजना राबवत असते. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे स्वप्न पूर्ण करता यावे हा सरकारचा उद्देश असतो. राज्य सरकार द्वारा महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता केवळ एक रुपयात पिक विमा (crop insurance) मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक रुपयात पीक विमा या योजनेची घोषणा केली होती. या योजनेला मंजुरी मिळाली असून, यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत. या योजनेअंतर्गत बाकी रक्कम राज्य सरकार देणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारला यासाठी कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. कारण 1 रुपयात पीक विमा मिळत यंदा जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा काढणार आहे. (1 rupyat pik vima yojana)
शेतकऱ्यांना या पिक विमा योजनेमध्ये पीकविमा भरायचा असेल तर यासाठी प्रति अर्ज केवळ एक रुपया आकारण्यात येणार आहे. (1 rupyat pik vima yojana maharashtra) ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचे राहील त्यांनी पीक विमा पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला पीक विमा काढून घ्यावा.
प्रति हेक्टरी किती पीक विमा मिळतो?
सोयाबीन – 49,000 रुपये
बाजरी – 24,000 रुपये
तूर – 35,000 रुपये
कांदा – 80,000 रुपये
भुईमूग – 40,000 रुपये
(नोट : प्रति हेक्टरी किती पीकविमा मिळणार आहे, यासाठी आपण अधिकृत पोर्टलवर माहिती घ्यावी.)
Pik Vima 2023 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) सातबारा उतारा व 8 अ
2) आधार कार्ड
3) बॅंक पासबुक
4) पिकपेरा
5) स्वयं घोषणापत्र
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.