सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार. पण माफीचा साक्षीदार म्हणजे काय??? मराठी कायदा वाचकांसाठी विशेष लेख.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. सीबीआयने वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली आहे. माफीचा साक्षीदार बनल्यानंतर वाझेला आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. मात्र माफीचा साक्षीदार म्हणून एखाद्या आरोपिस उभे करताना काय निकष असावेत हे जाणून घेणे महत्वाचं आहे.

माफीचा साक्षीदार कसा असावा?

  • जिथे गुन्हा घडताना गुन्हेगारांशिवाय कोणतीही दुसरी व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नसते. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा आणि साक्षीदारांची गरज असते. ज्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी कोणताही स्वतंत्र पुरावा आणि साक्षीदार उपलब्ध नसतो, अशा वेळी माफीचा साक्षीदार मदतीस येतो.
  • माफीचा साक्षीदार म्हणजे अशी व्यक्ती जी गुन्हा करते, गुन्हा होण्यास प्रवृत्त करते, गुन्हेगाराला गुन्ह्यांत मदत करते किंवा चिथावणी देते, गुन्हेगाराला संरक्षण देते किंवा त्यांना गुन्ह्याच्या स्थानापासून पळून जाण्यास मदत करते. माफीचा साक्षीदार म्हणजे जो व्यक्ती गुन्ह्याचा साक्षीदार आहे, बेकायदेशीर कृतीशी किंवा गुन्ह्याशी जोडलेला आहे, त्याचा गुन्ह्यामध्ये सक्रिय किंवा असक्रिय सहभाग आहे आणि त्या व्यक्तीने या गुन्ह्यात त्याच्या सक्रिय किंवा असक्रिय सहभागाची कबुली दिली आहे.
  • सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार नसावा, इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यात तो मुख्य आरोपी नसावा.
  • न्यायालयाचे न्यायाधीश आरोपीस माफीचा साक्षीदार करण्याची परवानगी देऊ शकतात. ही परवानगी केवळ ज्या गुन्ह्यास सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असलेल्या प्रकरणात दिली जाऊ शकते पण हे गुन्हे आर्थिक स्वरूपाचे नसावेत अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
  • माफीच्या साक्षीदारावर सहसा विश्वास ठेवणे धोकादायक असू शकते. काही वेळा हा माफीचा साक्षीदार उलटा फिरू शकतो आणि स्वतः साक्ष बदलू शकतो किंवा खोटी शपथ घेऊ शकतो. माफीच्या साक्षीदाराने जर खोटी साक्ष किंवा पुरावा दिला तर त्याला खोटी साक्ष देण्याच्या गुन्ह्याखाली अटक व शिक्षा होऊ शकते.

सर्व घटना एकदम थोडक्यात…

  • अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटेलियासमोर स्फोटक जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या.
  • त्यातील माहितगार मनसुख हिरेन याची हत्त्या.
  • दोन्ही प्रकरणी सचिन वाझे याला अटक, परमबीर सिंग यांचा सहभाग उघड.
  • परमबीर सिंग यांची बदली
  • परमबीर सिंग दिल्ली दौरा, एका भाजपा नेत्याची भेट.
  • परमबीर यांचे १०० कोटी वसूली बाबत मुख्यमंत्री यांना पत्र.
  • परमबीर सिंग यांची आणि जयश्री सदावर्ते यांची अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका.
  • उच्च न्यायालयाचे सीबीआयला एफआयआर दाखल करून तपास करण्याचे निर्देश.
  • ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या अनिल देशमुख यांच्यावर धाडी आणि शेवटी अटक.
Sharing Is Caring:

Leave a Comment