शैक्षणिक कर्ज घेताय ? या गोष्टींचा ही विचार करा

आजकाल शैक्षणिककर्ज (Education Loan) अनेक विद्यार्थी घेतात. दिवसें दिवस शिक्षण महागडं होत चाललं आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्या साठी किंवा परदेशात उच्च शिक्षण घ्यायचं असल्यास लाखो रुपयांचा खर्च येतो. अशावेळी शैक्षणिक कर्जा ची खूप मोठी मदत होते.

2004 साला पासून 2012 पर्यंतच्या काळात शैक्षणिक कर्जाच्या मागणीत 23℅ वाढ दिसून आली. पण कुठलं ही कर्ज घेताना काही नियम व अटी लक्षात घ्यायला हव्यात. शैक्षणिक कर्जाचं पुढे मोठ ओझं होऊ नये या साठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 

कॉलेज /कोर्स ची निवड करताना

  • परदेशात जायचं आहे म्हणून किंवा अन्य कोणी ॲडमिशन घेतली म्हणून कोर्स निवडू नका. जर खरंच तुम्हाला तो अभ्यासक्रम शिकण्यात स्वारस्य असेल तरच तो कोर्स निवडा व नंतरच शैक्षणिक कर्जा साठी अर्ज करा.
  • आपण बऱ्याच मोठमोठी कॉलेजेस आणि विद्यापीठां ची नावे ऐकून असतो. मात्र प्रवेश निश्चित करण्या अगोदर कॉलेजच्या प्लेसमेंट धोरणा विषयी पूर्व माहिती असणे आवश्यक आहे. 
  • प्लेसमेंट ची सुविधा चांगली असल्यास चांगली नोकरी मिळणे व कर्ज परतफेडीचं नियोजन करणे सोयी चे होते. 
  • जाहिरातीमधील  “१००% प्लेसमेंट असिस्टंस” आणि “१००%  प्लेसमेंट गॅरंटी” या दोन संकल्पना समजून घ्या. उगाचच प्लेसमेंट शब्द आहे, म्हणजे कोर्स पूर्ण झाल्या वर नोकरी मिळेल च असं नाही.
  • प्लेसमेंट असिस्टंस म्हणजे फक्त नोकरी साठी मदत असा अर्थ होतो. या मध्ये नोकरी मिळवून संस्था देत नाही. 

शैक्षणिक कर्ज- महत्वा च्या गोष्टी (Education Loan: Important points)

  • जेव्हा तुम्ही शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करता त्या वेळी स्वतः बँकेत जाऊन बँकेच्या अटी व पात्रतेच्या नियमांची माहिती घेणे आवश्यक असते. 
  • तुम्ही निवडलेला कोर्स ,कॉलेज आणि विद्यापीठ ,तिथे मिळणाऱ्या प्लेसमेंट्स किंवा नोकरीच्या संधी या सर्व गोष्टीं बद्दल तुम्ही जागरूक आहात, याचीही माहिती बँकेला देणे आवश्यक असते. सामान्यत: शैक्षणिक कर्जामध्ये तुमचे शिक्षण शुल्क, वसतिगृह, लायब्ररी फी, पुस्तके व कोर्स मटेरियल अशा विविध खर्चा चा समावेश असतो.
  • काही बँका विशिष्ट रकमेपर्यंत वाहन खरेदी, विमा संरक्षण, विनामूल्य क्रेडिट कार्ड इत्यादीं सारख्या अतिरिक्त सुविधादेखील प्रदान करतात
  • अर्जदारा ने सर्व अटी व शर्थीचे पालन केलेले असल्यास, अर्ज केल्यानंतर साधारणतः १५ दिवसां च्या आत कर्ज मंजूर केले जाते. 
  • कर्ज घेताना जाणकार व्यक्ती चा सल्ला घेणे चांगले.

Education Loan: शैक्षणिक कर्ज कुठल्या बँके कडून घ्यावे?

  • देशांतर्गत असो किंवा परदेशी शिक्षण घायचे असो बँका सर्व प्रकार च्या शैक्षणिक अभ्यासक्रमांना कर्ज सुविधा देतात . 
  • आपण कुठल्या बँके कडून कर्ज घ्यायचं, हे आपल्या सोयी नुसार आणि कर्जाच्या आवश्यकते नुसार ठरवावे.  
  • बँक निवडताना हफ्त्याची पद्धत, परतफेडीच्या अटी ,व्याजदर या गोष्टीं कडे लक्ष द्यावे. 
  • मुदती च्या आधी कर्ज फेडता येऊ शकते का, याबद्दलच्या नियम व अटी समजून घ्याव्यात. 
  • सर्वात जास्त कर्जाची रक्कम देणाऱ्या बँके पेक्षा सर्वोत्तम ऑफर देणारी बँक निवडणे फायद्याचे ठरेल. 
  • काही बँक मुलींसाठी ०.५% ते १% कमी व्याज दर आकारतात. त्या संदर्भात माहिती घ्या. 

डिफॉल्टर नका होऊ

  • कर्ज घेताना विद्यार्थ्यां सोबत त्यांच्या पालकांच्याही सह्या घेण्यात येतात. याचाच अर्थ या कर्जा मध्ये पालक सह-कर्जदार असतात. 
  • कर्जाचे हफ्ते नियमितपणे भरले गेले नाहीत, तर ९० दिवसांच्या प्रतीक्षे नंतर बँक तुमचे नाव  कर्ज न फेडणाऱ्यांच्या यादीत म्हणजे  ‘डिफॉल्टर लिस्ट मध्ये टाकते. 
  • यामुळे भविष्यात विद्यार्थी व पालक दोघांच्याही क्रेडिट वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडण्यास अक्षम असाल, तर तुम्ही बँकेला विश्वासात घेऊन तुमच्या परतफेडी ची मुदत वाढवून घेऊ शकता. कर्जाची परतफेड करणे शक्य नसेल तर कर्ज घेतानाच योग्य नियोजनपूर्वक घ्यावे.

परतफेडी चे नियोजन? (Repayment Strategy)

  • मोरॅटोरिअम कालावधी नंतर म्हणजेच अभ्यास संपल्या नंतर एक वर्षा नंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांनंतर, जे आधी असेल त्या पासून परतफेड सुरू होते. 
  • ईएमआय सुरू होण्या पूर्वी कर्जदारा कडे परतफेड करण्याचे धोरण असले पाहिजे.
  • विद्यार्थी कर्जदारां ना अनेक सवलती मिळतात. या सवलती विद्यार्थ्यां वर येणारे परतफेडीचे ओझे कमी करण्या साठी वापरल्या जाऊ शकते.
  • खर्च कमी करून बचतीस सुरूवात करा. 
  • बँक कोर्सच्या किंवा सेमेस्टरच्या शेवटी वितरणाच्या वेळे पासून व्याज आकारण्यास सुरू करते. ही रक्कम वाढतच राहते.
  • ईएमआय कमी करण्या साठी कोर्स  चालू असताना काही प्रमाणात रक्कम भरू शकता. या कालावधीमध्ये तुम्ही व्याज दिले, तर  ईएमआय मोठ्या प्रमाणात कमी होईल. 
  • कित्येक बँका स्थगिती कालावधीत व्याज भरणार्‍यांना एक टक्का व्याज सवलत ही देतात.
  • परतफेड करण्या ची क्षमता पाहून बँका कर्ज वाढवतात. अर्थात ही गोष्ट सहसा कोर्स पूर्ण झाल्या नंतर विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधीवर आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. परंतु, कर्ज घेणारा चांगले उत्पन्न किंवा नोकरी मिळविण्यात अयशस्वी झालाच, तर काय करावे?

वेळेवर नोकरी न मिळाल्यास काय कराल ?

  • काही बँका कर्ज पुढे ढकलण्यास परवानगी देतात, परंतु या साठी बँकेला भविष्यात कर्ज फेडण्याची हमी  द्यावी लागते. अर्थात ही गोष्ट  तशी कठीण आहे.
  • मुदत वाढ देताना बँक अनेक गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार करते. उदा. विद्यार्थ्यां ची क्षमता, विश्वासार्हता, शैक्षणिक प्रगती, इत्यादी.
  • अपवादात्मक परिस्थिती मध्ये बँक विचार करून कर्जफेड करण्यास मुदत वाढ देऊ शकतात, उदा. सध्याची कोरोना महामारी.

शैक्षणिक कर्ज घेऊन अनेक हुशार विद्यार्थ्यां नी आपले करिअर घडवले आहे. मुळात हुशार मुलांचे शिक्षण ‘पैसा या कारणा मुळे थांबू नये हाच शैक्षणिक कर्जाचा उद्देश आहे. त्या मुळे शैक्षणिक गरजे साठी कर्ज घेण्या साठी अजिबात कमीपणा बाळगू नका, मात्र ते घेताना परतफेडी चे नियोजन आधीच करून ठेवा. 

Sharing Is Caring:

Leave a Comment