मला कायदा माहीत नव्हता हे विधान कायद्यात का चालत नाही?

“IGNORATIA FACT EXCUSAT INGORANTIA JURIS NON EXCUSAT.”

याचा अर्थ : वस्तुस्थिती किंवा घटनेबाबतचे अज्ञान एक वेळ माफ करता येईल; परंतु कायद्याचे अज्ञान माफ करता येणार नाही. स्पष्टीकरण: वस्तुस्थिती किंवा घटनेबाबतचे अज्ञान टाळता येत नाही.
पूर्वजांच्या मृत्यूबाबत वारस अज्ञान असेल तर ते घटनेबाबत अज्ञान म्हणता येईल. परंतु मृत्यूबाबत माहिती आहे; तसेच नात्याबाबत माहिती आहे. परंतु त्या मृत्यूमुळे काही हक्क प्राप्त झाल्याची माहिती नसल्यास ते त्याचे कायद्याचे अज्ञान म्हणता येईल. म्हणून कायद्याचे अज्ञान ही सबब कोणीही सांगू शकत नाही. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात कायद्याचे अज्ञान हा बचाव घेतला गेल्यास न्याय प्रशासनास ते अशक्य व कठीण होईल.

प्रत्येक नागरिकास तो ज्या भूभागावर वास्तव्य करतो त्या भूभागा कायदे माहीत आहेत हे गृहीत न्यायदानाच्या बाबतीतील तत्त्व मानले आहे. केंद्र सरकारने तयार केलेले व पंचवीस राज्यांनी तयार केलेले कायदे प्रत्येक नागरिकास माहिती असणे अशक्य आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची परिपत्रके, सूचना, नियमावली प्रसिद्ध झाल्यावर ती प्रत्येक नागरिकाने वाचल्याचे गृहीत धरले आहे. कायद्याचे अज्ञान आणि कायद्याचे उल्लंघन करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. अज्ञान म्हणजे अलिप्तता, दुरावा आणि उल्लंघन म्हणजे कायद्याविरुद्धची कृती-अपकृती. कायद्याच्या अज्ञानात कायद्याची माहिती गृहीत धरलेली नाही; परंतु कायद्याच्या उल्लंघनात कायद्याची माहिती गृहीत धरलेली आहे.

अगदी उत्तम उदाहरण म्हणजे रेल्वे टी.सी.ने विना टिकीट प्रवासासाठी पकडल्यास, पकडलेल्याने अहो शंभर लोक असेच जातात त्यांना का सोडता आणि मलाच पकडता असे वाक्य वापरणे हे त्याला तो करीत असलेल्या गुन्ह्याची तसेच कायद्याची माहिती आहे हेच गृहितच धरले जाते. अशांना दोषीच पकडले जाते.

Sharing Is Caring:

Leave a Comment