स्मार्टफोन सतत हँग होतोय? मग ‘हे’ उपाय नक्की करा

आजचा काळ स्मार्टफोनचा आहे. आपला स्मार्टफोन आपली सगळी कामे अगदी चुटकीसरशी करतो. या कामाच्या भारामुळे फोन हँग होतो, जर कामाच्या वेळेस फोन हँग होत असेल तर आपण वैतागतो आणि म्हणतो फोन बदलू, पण फोन न बदलता ही आधी सारखा चालावा असे वाटत असेल तर कोणते उपाय करावेत? आपण जाणून घेऊयात,आपला स्मार्टफोन हँग होण्याची बरीच कारणे आहेत.

कमी क्षमतेची फोन मेमरी

फोनमध्ये विविध स्वरूपातला डेटा व अॅप्स साठवण्यासाठी असलेली जागा जिला फोन मेमरी म्हणतात, ती मर्यादित स्वरूपाची असूनही त्याच्याहून जास्त मेमरी व्यापणारे अॅप्स आपण डाउनलोड करून वापरले तर फोन हँग होतो.

मेमरी फुल होणे

आपल्या फोनमध्ये ज्यांची गरज नाही असे फोटो, व्हिडीओ, फाईल्स, अॅप्स यांची खूपच गर्दी होऊन जाते. आणि या स्वरूपात डेटा भरला गेला की त्याचा फोनवर भार येतो आणि फोन हँग होतो.

मल्टीटास्किंग करणे

आपण एकाच वेळी फेसबुक, व्हॉट्सअॅप यासारखी अनेक अॅप्स एकाच वेळेस वापरली जातात. यालाच मल्टीटास्किंग म्हणतात. हे मल्टीटास्किंग सतत केल्याने मोबाईल हँग होतात.

व्हायरस असणे

मोबाईलमध्ये जर व्हायरस असेल तरीही फोन आपले कार्य आधीसारख्या वेगाने करू शकत नाही व फोन हँग होतो.

मोबाईल हँग होऊ नये म्हणून काय उपाय करायला हवेत?

फोन अपडेट करा:

आपण अँड्रॉईड फोन वापरात असू तर त्यात अॉपरेटिंग सिस्टमचे जे काही अपडेट्स येत असतील तर ते वेळच्या वेळी केले पाहिजेत. सतत येणारे अॅप्सचे अपडेट्स ही करायला हवेत. यामुळे फोन वेगवान होतो.

कॅशे क्लिअर करा:

आपल्या फोन मधील अॅप्स हे काही कालांतराने जास्त जागा घ्यायला लागतात. तर हे कॅशे क्लिअर करायला हवेत. यासाठी अॅपच्या लोगोवर क्लिक करून थांबून राहावं आणि त्यानंतर स्क्रीन वर काही पर्याय दिसतील, त्यातील अॅप इन्फो हा पर्याय निवडावा. त्यावर क्लिक केल्यानंतर स्टोरेज आणि कॅशे हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ‘क्लिअर कॅशे’ या पर्यायावर क्लिक करून इंटरनल स्टोरेज सतत रिकामे ठेवावे.

फोन वेळच्या वेळी रिकामा करत राहा:

फोनमधील अनावश्यक अॅप्स डिलीट करायला हवीत. जेव्हा गरज असेल तेव्हा ते क्षणार्धात पुन्हा डाउनलोड करता येऊ शकतात. जे मेसेज आपल्याला नको आहेत, ते डिलीट करायला हवेत. कॉल रजिस्टर क्लिअर करायला हवेत.

इंटरनल मेमरीकडे लक्ष द्या:

फोटो, व्हिडिओ, गाणी, गेम्स यामुळे यांच्यामुळे इंटरनल मेमरी अगदी काठोकाठ भरून जाऊ नये याकडे लक्ष द्यायला हवं. हा डेटा आपण वेळच्या वेळी मेमरी कार्ड वर ट्रान्सफर करायला हवा. तसेच आपले फोटो हे वन ड्राईव्ह किंवा गुगल ड्राईव्ह यासारख्या अॅप्सवर सेव्ह करावेत, यामुळे एकतर फोनची इंटरनल मेमरी कायमच रिकामी राहते आणि फोन बदलला, बिघडला, हरवला तरीही आपल्याला हवे असणारे फोटो सहज पुन्हा मिळवता येतात.

बॅकग्राऊंड अॅप्सकडे पहा:

आपल्या मोबाईलमध्ये असे काही अॅप्स असतात ज्यांचा वापर आपण खूप कमी वापर करत असतो. तर अशा अॅप्सना फोर्स स्टॉप करायला हवे. कारण हे अॅप्स बाकीचे अॅप्स वापरत असताना बॅकग्राऊंडला चालू अवस्थेत असतात, यामुळे इंटरनल मेमरीचा भाग व्यापला जातो. यात देखील आपण अॅपच्या लोगोवरून अॅप इन्फो पर्यायावर जाऊन स्क्रीनवर दिसणारा फोर्स स्टॉप या पर्यायावर क्लिक करायला हवं. म्हणजे ही बॅकग्राऊंड अॅप्स काम करायची थांबतील.

आता ही माहिती वाचल्यानंतर आपल्याला काळजी नाही. कारण वर दिलेले उपाय आपण करून पाहिले तर आपला फोन हँग होणार नाही. ही माहिती आपल्याला आवडली का हे आम्हांला नक्की सांगा.

Sharing Is Caring:

Leave a Comment