सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

सरपंच उपसरपंच यांच्या वर अविश्वास ठराव कसा आणावा महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरंपच याच्यावर अविश्वास ठरावाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच याच्या अविश्वास ठरावाबाबत जिल्हाधिकारी यांनी संदर्भिय पत्रान्वये मार्गदर्शन मागितले आहे. तसेच वारंवार वेगवेगळ्या जिल्हयांकडून शासनास यासंदर्भात विचारणा केली जाते.

हे देखील वाचा- ग्रामसेवक, ग्रामविकास पदे रद्द होणार!

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच याच्या अविश्वास ठरावाबाबत त्या त्या पंचायतीच्या कोणत्याही सभेस उपस्थित राहण्याचा व मतदानाचा हक्क असणान्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या तीन चतुर्थांश (३/४) पेक्षा कमी नसेल इतक्या बहूमताने जर असा अविश्वास प्रस्ताव संमत करण्यात आला असेल.

जिल्हाधिकाऱ्याने या प्रयोजनार्थ नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाव्दारे त्या अविश्वास प्रस्तावाला संगती दिली असेल तर सरपंच किंवा यथास्थित, उपसरपंच त्या पटांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्याचे व त्यांची कार्ये व कर्तव्ये पार पाडण्याचे ताबडतोब थांबवील आणि जर तो अविश्वास प्रस्ताव सरपंचाच्या विरुध्द संमत करण्यात आला असेल तर त्यानंतर असे अधिकार कार्य व कर्तव्ये उप सरपंचाकडे विहित होतील ” असे नमूद करण्यात आलेले आहे.

परंतु सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या निवडणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीच्या आत आणि पंचायतीच्या मुदत समाप्त होण्याच्या दिनांकाच्या लगतपूर्वीच्या सहा महिन्याच्या आत असा कोणताही अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाणार नाही.

हे देखील वाचा- जमिनीच्या वादावर तक्रार पत्र

सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहे.

1. ग्रामपंचायत सुधारणा अधिनियमामध्ये सरपंच निवडणूकीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीच्या आत अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाणार नाही. तथापि सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ग्रामपंचायत निवडणूका हया मुदत संपण्याच्या अगोदर एक ते दोन महिने होत असतात.

त्यानंतर मुदत संपण्याच्या दिनांकालगतच्या नंतरच्या तारखेस प्रथमसभा होवून सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकाळ सुरु होतो, त्यामुळे अविश्वास ठरावाबाबत दोन वर्षाच्या कालावधीची गणना करताना सरपंच/उपसरपंच हा त्याने पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून गणना करण्यात यावी.

२. सरपंच / उपसरपंच यांचेवर दाखल अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने कार्यवाही करताना तहसिलदार यांचेकडे अविश्वास ठरावाची नोटिस दाखल झाल्यानंतर सात दिवसांच्या आत यापूर्वी अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपध्दतीने ग्रामपंचायत सदस्यांची सभा सबंधित तहसिलदार यांनी बोलविण्यात यावी.

सदर विशेष सभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर झाल्यास तहसिलदार यांनी तसा अहवाल त्याच दिवशी अथवा लगतच्या दिवसापेक्षा अधिक होणार नाही (सुट्टीचा दिवस वगळून) या कालावधीत जिल्हाधिकारी यांचेकरं सादर करावा.

3. जिल्हाधिकारी यांनी अविश्वास ठराव संमत आल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगतच्या दिवसापेक्षा उशीर होणार नाही या कालावधीत विशेष ग्रामसभा आयोजण्याचे आदेश काढावेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशाच्या दिनांकणतून दहा दिवसाचे आत गट ब पेक्षा कमी दर्जा नसणाऱ्या अधिकान्यामार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे.

4. विशेष ग्रामध्ये सरपंच, उपसरपंच यांचेविरुध्द झालेल्या अविश्वास ठरावाला संमती देणे हा एकच विषय असावा.

5. विशेष ग्रामसभेची नोटिस ही कमीत कमी गुर्ण तीन दिवस अगोदर बजावण्यात यावी. (नोटिसीचा दिनांक व बजावल्याचा दिनांक यासह). सदरची नोटिस बजावताना ग्रामपंचायत सचिव यांनी सरपंच/उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना नोटिस बजावण्याच्या पध्दतीने (सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाच्या ठरावाविरुध्द नियम, १९७५ च्या नियम २ब नुसार) तर ग्रामपंचायत मतदार यांचेकरीता गावाचे ग्रामपंचायत कार्यालय, जाहिर दंबडी याव्दारे प्रसिध्दी देवून प्रसिध्द करावी.

6. विशेष ग्रामसमे करीता ग्रामसभा बैठकीसाठी गणपुर्तीची (कोरम) आवश्यकता असेल.

7. अविश्वास ठरावाला ग्रामसभेची मंजूरी ही गुप्त मतदान पध्दतीने घेण्यात येईल. सदर की आवश्यक असणारी मतदार यादी म्हणून त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची अविश्वास प्रस्ताव दाखल होण्यापूर्वीच्या अर्हता दिनांकावर प्रसिध्द झालेली विधानसभेची अंतिम मतदार यादी वापरण्यात यावी.

8.एकच यादी भागामध्ये दोन अथवा अधिक ग्रामपंचायतीचे क्षेत्र समाविष्ठ होत असल्यास गटविकास अधिकारी यांची सबंधित ग्रामपंचायत सचिव यांचे सहाय्याने सदर गावचे मतदार निश्चित करुन विधानसभेची अर्हता दिनांकवरील मतदार यांदी दुसऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांच्या नावावर लाल पेनाने “X” अशी पुर्ण रेष मारुन ग्रामसभेच्या दिनांकापुर्वी ग्रामपंचायत चावडीवर तलाठी सजा कार्यालयावर प्रसिद्धी दयावी.

सदर यादींवर त्याच दिवशी हरकत मागविण्यात येवून अंतिम करण्यात यावी व ग्रामसभेच्या दिवशी नियुक्त अधिकारी यांना उपलब्ध करुन दयावी. सदर यादी बनविण्याची कार्यवाही ही गट विकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायत सचिवाच्या सहाय्याने ज्या दिवशी अविश्वास ठरावासंबंधी तहसिलदारास नोटीस प्राप्त झाली त्या दिवसापासून करावी जेणे करून या कार्यवाहीसाठी पुरेसा वेळ मिळेल अन्य बाबतीत यादी प्रसिध्द करण्याची आवश्यकता नाही.

९. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहूमताने अविश्वास ठरावास मंजूरी देण्यात आलेली असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झालेला आहे असे समजण्यात येईल.

विशेष ग्रामसभेमध्ये अविश्वास ठराव फेटाळण्यात आला असेल आणि जरी ग्रामपंचायत सदस्यांकडून विशेष सभेमध्ये सदरचा ठराव तीन चतुर्थांश 3/4 अथवा त्यापेक्षा जास्त बहुमताने संमत झालेला असतानाही संमत झालेला नाही असे समजण्यात येवून तो सरपंच / उपसरपंच त्याचे पदावर कायम राहिल.

१०. वरील अविश्वास ठराव व त्याबानतचे अभिलेख यांचे विहीत कालावधीपर्यंत जतन करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत सचिव यांची राहिल.

Sharing Is Caring:

Leave a Comment