सरकारी नोकरी आणि टॅटूचा काय संबंध? टॅटू काढायला का बंदी असते?

हल्ली टॅटू काढणं म्हणजे फॅशनचा एक भागच किंवा स्टाईल स्टेटमेंट झाला आहे. एखाद्या व्यक्तीप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं किंवा आठवणी जपणं अशा काही कारणांनी अनेक जण आपल्या शरीरावर टॅटू काढून घेतात. मात्र आपल्या शरीरावर टॅटू काढू पाहणाऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सामान्यतः सांगितली जाते. ते म्हणजे “टॅटू काढू नकोस सरकारी नोकरी मिळणार नाही!” आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की टॅटू काढल्यावर सरकरी नोकरी मिळत नाही. पण नेमकं सरकारी नोकरीत टॅटूला बंदी का असते ? हे अनेकांना माहीत नाही. चला तर मग जाणून घेऊया आजच्या लेखात.

सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला काही प्रक्रियांना सामोरं जावं लागतं त्यामध्ये व्यक्तीचं कौशल्य, वागणूक, विचार या सोबतच व्यक्तीची वैद्यकीय चाचणी देखील केली जाते. सरकारी नोकरीच्या नियमानुसार व्यक्तीच्या इतर वैद्यकीय चाचण्यांसोबतच शरीरावर टॅटू नाही ना! याची देखील खात्री केली जाते. त्याव्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा टॅटू असल्यास त्याला सरकारी नोकरी मिळत नाही.

सरकारी नोकरीत टॅटू का चालत नाही या विषयी वरीष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांकडून तीन गोष्टी कळतात.

१. आरोग्याला धोका –

टॅटूमुळे त्वचा रोग किंवा रक्ताचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. या सोबतच टॅटू काढल्यामुळे एच.आय.वी, एलर्जी, हेपेटाईट्स इत्यादि रोग होण्याच्या संभावना निर्माण होतात. त्यामुळे जर टॅटूमुळे कर्मचाऱ्यास हे रोग झाले तर त्याची भरपाई सरकारी नोकरीतून करणे अवघड होते.

२. असुरक्षितता निर्माण होते –

टॅटू म्हणजे आपल्या शरीरावर एक विशिष्ट खूण म्हणून ओळखली जाते. सरकारी नोकरी जसं की पोलीस किंवा आर्मी यात रुजू असणाऱ्या व्यक्तीने जर टॅटू काढलेला असेल तर त्याच्यावर नजर ठेवणं किंवा निशाणा साधणं यासारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात ज्यामुळे आपल्या देशाला आणि त्या व्यक्तीला धोका निर्माण होतो. म्हणून सुरक्षितता राखण्यासाठी टॅटूला सरकारी नोकरीमध्ये बंदी घातली जाते.

३. मानल्या जाणाऱ्या गोष्टी –

ज्या व्यक्तीच्या शरीरावर टॅटू काढलेला असतो ती व्यक्ती स्वतःच्या कामाशी तत्वांशी एकनिष्ठ किंवा गंभीर नाही असं मानलं जातं. सरकारी नोकरीसाठी शिस्तप्रिय आणि त्या व्यक्तीचं सामान्य दिसणं महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरावर टॅटू असतो त्या व्यक्तीला सरकारी नोकरीत जागा मिळत नाही.

आता कोण कोणत्या सरकारी पदासाठी टॅटू चालत नाही ते पाहू.

१. आर्मी

२. सी.आर. पी. एफ

३. नेवी

४. ऐअर फोर्स

५. पोलीस

६. आय. ए. एस

७. इंडियन फिडेन्स सर्व्हिस या सरकारी पदांसाठी टॅटू अजिबात चालत नाही.

पण तुम्हाला माहीत आहे का ? सरकारी नोकरीत वरील पदांसाठी टॅटू चालत नसला तरी काही सरकारी पदं अशी आहेत जिथे टॅटू चालतो. ती म्हणजे

१. इंजिनियरिंग सर्व्हिस

२. बँक ऑफिसर

३. पी. डब्लू.डी डिपार्टमेंट

४. भारतीय रेल्वे या पदांसाठी आपल्या शरीरावर टॅटू असला तरी चालतो.

सरकारी नोकरीसाठी कोणत्याच प्रकारचे टॅटू चालत नाही का ?

अनेकदा व्यक्ती लहान असतानाच त्यांच्या धर्मानुसार किंवा परंपरेनुसार त्यांच्या शरीरावर, चेहेऱ्यावर गोंदण बंधनकारक असतं त्यामुळे सरकारी नोकरीसाठी जर तुम्ही विचार करत असाल आणि असं गोंदण असेल तर त्यामागे परंपरा किंवा धर्म याचं कारण असेल तर असे टॅटू किंवा गोंदण चालतात.

खासगी नोकरीत टॅटू चालतो का ?

या प्रश्नाचं अनेकदा हो आणि नाही या दोन्ही प्रकारे उत्तर मिळतं. आजही अशा काही खासगी कंपन्या आहेत ज्या कर्मचाऱ्याला केवळ टॅटूमुळे नोकरी देत नाहीत. मात्र अशा कंपन्यांच्या संख्येपेक्षा टॅटू चालणाऱ्या अनेक खासगी कंपन्या आहेत म्हणून आपल्या शरीरावर टॅटू असेल तर घाबरुन जाण्याची गरज नाही. फोटोग्राफी, डिसायनिंग, मीडिया, फॅशन डिसायनिंग या खासगी क्षेत्रात टॅटूला चांगलाच वाव असतो. इथे टॅटू म्हणजे कलेचाच एक भाग असल्यामुळे टॅटूवर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं.

तुम्हाला ही टॅटू काढण्याची खूप इच्छा आहे तर एकदा आपल्या करियरचा मार्ग कोणता आहे हे निश्चित करा म्हणजे केवळ एका टॅटूसाठी तुम्हाला नोकरीची चांगली संधी गमवावी लागणार नाही किंवा नोकरीमुळे टॅटू काढण्याची हैस पूर्ण करता येत नाही म्हणून निराशा होणार नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment