शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतात म्हणजे काय करतात?

सर्वप्रथम शेतकरी म्हणून, अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे किंवा गारपिटीमुळे किंवा अवर्षणामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार दरबारी रुजवात करावी लागते व सरकारने तसे जाहीर केल्यावर स्थानिक अधिकारी सदर शेतात जाऊन सदर शेतीचा नुकसानीचा अहवाल तयार करतात व जाहीर झाल्यानुसार सदरचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळतात. हे पैसे सरकार देत असल्याने ते पैसे लोकांच्याच घेतलेल्या करांच्या माध्यमातून उभे केलेले असतात हे लक्षात घ्यावे. आधीचे कर्ज असताना येणाऱ्या नव्या मोसमासाठी नवे कर्ज घेता येत नसल्याने आधीचे कर्ज माफ झाल्यास तो शेतकरी त्याचा फायदा घेऊन नवीन उभारीने स्वतःच्या शेतासाठी पैसे खर्च करणार व पुन्हा उभा राहणार हीच भावना यात असते हे लक्षात राहू द्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment