शानदार ऑफर्स! Maruti च्या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी

या ऑफर्स कंपनीच्या Alto, Celerio, Swift, Wagon R आणि S-Presso हॅचबॅकवर उपलब्ध आहेत. मात्र, CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.

मारुती सुझुकी या महिन्यात (जुलै 2022) आपल्या अरिना रेंज मॉडेल्सवर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. या ऑफर्स कंपनीच्या Alto, Celerio, Swift, Wagon R आणि S-Presso हॅचबॅकवर उपलब्ध आहेत. मात्र, CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.

याचबरोबर, Ertiga फेसलिफ्ट MPV वर कोणतीही सूट लागू नाही. तर वेगवेगळ्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. Maruti Suzuki Celerio आणि Maruti Suzuki Wagon R वर 25,000 रुपयांपर्यंत ऑफर्स आहेत. Celerio अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, या सर्वांमध्ये 1.0-लिटर K10C (67hp) पेट्रोल इंजिन मिळत आहे. तसेच, Wagon R मध्ये दोन इंजिन ऑप्शन- 1.0-लीटर पेट्रोल आणि 1.2-लीटर K12C DualJet पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे.

याशिवाय, मारुती सुझुकी स्विफ्टवर 18,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स आहेत. स्विफ्ट आपल्या किफायतशीर इंजिन, राइड आणि हँडलिंग बॅलन्ससाठी ओळखली जाते. यात 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (90hp) मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच, मारुती सुझुकी ऑल्टो 800 वर 23,000 रुपयांपर्यंत ऑफर्स उपलब्ध आहेत. ऑल्टो फक्त 796cc इंजिनसह येते.

मारुती सुझुकी Eeco वर 20,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स मिळत आहेत. मारुती सुझुकीच्या परवडणाऱ्या MPV Eeco मध्ये 1.2-लिटर इंजिन (73hp, 98Nm) युनिट उपलब्ध आहे. हे 5-सीटर, 7-सीटर आणि कार्गो व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि या सर्व व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपर्यंत सूट आहे. याशिवाय मारुती सुझुकी डिझायरवर 15,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. 

मारुती सुझुकी डिझायर ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. ही मारुती स्विफ्टवर आधारित सेडान आहे. मारुती सुझुकी S-Presso वर तुम्ही 20,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यात 1.0-लिटर इंजिन (68hp) आहे. S-Presso च्या सर्व व्हेरिएंटवर 20,000 रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला याठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की, कोणत्याही कारच्या CNG व्हेरिएंटवर ऑफर्स नाहीत.

(टीप- ऑफर्स या शहर आणि डीलरच्या आधारावर बदलू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी डीलरशी संपर्क साधा.)

Sharing Is Caring:

Leave a Comment