वॉरंटशिवाय पोलीस खालील गोष्टींच्या वेळेस अटक करु शकतील.

I) ( कलम ४१ (१) अन्वये ) प्रथम कोणताही पोलीस अधिकारी खालील वेळेस अटक करु शकेल.

अ) ज्या व्यक्तिचा दखलपात्र अपराधाशी संबंध आहे अथवा त्याबाबत जिच्याविरुद्ध वाजवी फिर्याद करण्यात आली आहे किंवा तशी विश्वसनीय खबर मिळालेली आहे किंवा जिचा वाजवी संशय आल्यास…

ब) एखाद्या व्यक्तिकडे घरफोडीचे हत्यार मिळाले असल्यास व तसे ते ठेवण्याबाबत कोणतीही कायदेशीर सबब नसल्यास यात कोणतीही दिलेली सबब सिद्ध करावी लागते.

क) ज्या व्यक्तिला फौजदारी प्रक्रिया संहितेखाली किंवा राज्य शासनाच्या आदेशाद्वारे अपराधी म्हणून उद्घोषित करण्यात आले असल्यास.

ड) ज्या व्यक्तिकडे चोरीची मालमत्ता म्हणून वाजवी संशय घेता येईल अशी कोणतीही गोष्ट आढळल्यास किंवा अशा वस्तूसाठी सदर व्यक्तिने अपराध केला असल्याचा वाजवी संशय आल्यास.

इ) आपले कर्तव्य बजावीत असताना पोलीस अधिकाऱ्यास जी व्यक्ति अडथळा आणते किंवा जी व्यक्ति कायदेशीर हवालतीतून निसटली आहे किंवा निसटण्याचा प्रयत्न करीत असल्यास.

फ) जी व्यक्ति संघराज्याच्या सशस्त्र सेनादलांपैकी कोणत्याही सेनादलातून पळून आली असल्याचा वाजवी संशय आल्यास.

ग) ज्या व्यक्तिने असे कृत्य केले असेल जे भारतात केले असते तर गुन्हा ठरले असते व असे कृत्य संबंधीताने भारताबाहेर केले असल्यास किंवा त्याबाबत कोणी तशी फिर्याद दिली असल्यास किंवा विश्वसनीय खबर असल्यास किंवा तसा वाजवी संशय आल्यास.

ह) ज्या व्यक्तिने दोषी ठरुन भा. दंड. संहिता कलम ३५६ (५) “प्रमाणे ज्याने तरतूद करताना आढळल्यास. केली असताना त्या कलमातील नियमांचा भंग

य) ज्या व्यक्तिबाबत दुसऱ्या पोलीस ठाण्यातून सदर व्यक्तिबाबत अटकेकरीता लेखी अथवा तोंडी मागणी केली असल्यास व सदर मागणीपत्रात केलेला अपराध वा रितसर कारण दिलेले गेले असल्यास संबंधीत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यास अटक करण्याचा अधिकार राहिल.

ii) कलम ४१ (२) अन्वये पोलीस ठाण्याचा कोणताही अधिकारी कलम १०९ वा ११० मध्ये निर्दिष्ट केलेल्यापैकी एका किंवा त्याहून अधिक प्रवर्गातील कोणत्याही व्यक्तिला तशाच रितीने अटक करु शकेल किंवा अटक करवू शकेल.

(iii) कलम ४२ अन्वये – नांव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार दिल्यावरुन अटक –

ज्या व्यक्तिने पोलीस अधिकाऱ्यासमक्ष बिनदखली अपराध केलेला असेल किंवा त्याने तसे अपराध केल्याचा आरोप असेल अशी कोणत्याही व्यक्तिने, अशा अधिकाऱ्याने मागणी केल्यावर आपले नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार दिल्यास किंवा नाव व राहण्याचे ठिकाण खोटे सांगितले असल्याचे अधिकाऱ्यास वाटल्यास त्या व्यक्तिस त्याचे नांव व राहण्याचे ठिकाणाची खात्री करुन घेण्यासाठी सदर अधिकारी अटक करु शकेल. अशा अटक झालेल्या व्यक्तिने आपले खरे नांव आणि राहण्याचे ठिकाण सांगितल्यावर व त्याबाबत खात्री झाल्यावर त्याने दंडाधिकाऱ्यासमोर सुटकेसाठी उपस्थित होताना जामीनदारांसहीत किंवा त्यांच्याविना असे बंधपत्र ( Suriety Bond ) निष्पादित करुन दिल्यास त्यास सोडण्यात येईल. परंतु अशी व्यक्ति भारतातील रहिवासी नसल्यास त्या बंधपत्राला भारतात रहिवासी असलेला जामीनदार यांचा जामीन घेतला जाईल.

मात्र अशा व्यक्तिचे खरे नांव अथवा राहण्याचे ठिकाणाबाबत अटक झाल्यापासून चोवीस तासांच्या आत खात्री झाली नाही किंवा बंधपत्र निष्पादित करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा फर्मविल्यावरही पुरेसे जामीनदार देण्यास ती व्यक्ति चुकली तर अशा व्यक्तिस अधिकारीता असलेल्या सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यापुढे तिला पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.

(iv) कलम १५१ अन्वये कोणत्याही व्यक्तिकडून दखलपात्र अपराध घडण्याची माहिती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जर अपराध केला जाण्यास प्रतिबंध करावयाचा असल्यास सदर व्यक्तिस दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याच्या कारणास्तव दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय किंवा वॉरंटाशिवायही अटक करता येईल.

मात्र अशा अटक केलेल्या व्यक्तिस २४ तासांपेक्षा जास्त काळ स्थानबद्ध करता येत नाही. मात्र १५१ (३) ह्या कलमानुसार जर सदर व्यक्ति मोकळी राहणे हे सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बाधक ठरु शकेल अशी परिस्थिती असल्यास अशा व्यक्तिस एकावेळेस १५ दिवसांपर्यंत व मुदत वाढवत जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंत अटकेत स्थानबद्धता देता येते.

v) कलम ४३२ (३) प्रमाणे जो आरोपी शिक्षा भोगत होता व ज्यास कोणत्याही शर्तीवर शिक्षा निलंबित किंवा माफ झाली होती त्या शर्तीची सरकारच्या मते पूर्तता झाली नसल्यास सदर व्यक्तिबाबत सरकारला निलंबन किंवा माफी रद्द करता येते व ज्या व्यक्तिबाबत शिक्षा निलंबित किंवा माफ झालेली असेल ती मुक्त असल्यास त्या व्यक्तिस कोणताही पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय अटक करु शकेल व सदर व्यक्ति जो “पॅरोल “वर बाहेर असेल त्यास त्याची राहिलेल्या भागाची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात रवानगी करेल.

Sharing Is Caring:

2 thoughts on “वॉरंटशिवाय पोलीस खालील गोष्टींच्या वेळेस अटक करु शकतील.”

Leave a Comment