राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकार ला गुरुवारी बहुमत सिद्ध करण्या स सांगितलं आहे. या नंतर शिवसेने चे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून तातडी ने सुनावणी घेण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने याचिके वर तातडी ने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे. संध्याकाळी पाच वाजता शिवसेने च्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुपारी ३ पर्यंत आम्ही सर्व कागद पत्रं रेकॉर्डवर ठेवू अशी माहिती सुनील प्रभू यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा मुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपा ने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे सादर केलं. यानंतर राज्यपालांनी महा विकास आघाडी सरकारला उद्या म्हणजेच गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर शिवसेने ने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडता ना ही बहुमत चाचणी बेकायदे शीर असून १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही असं सांगितलं. आजच यावर सुनावणी व्हावी अशी मागणी ही यावेळी त्यांनी केली.
जो पर्यंत तुम्ही आम्हाला कागदपत्रं देत नाही तोवर आम्हाला बहुमत चाचणी कधी आहे कसं कळणार अशी विचारणा केली. यावर अभिषेक मनू सिंघवी यांनी आपण आज संध्याकाळ पर्यंत कागदपत्रं सादर करु असं सांगितलं. हवं तर ६ वाजता सुनावणी ठेवा अशी विनंती ही त्यांनी केली.
यावर राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या वकिलां नी बहुमत चाचणी साठी बोलावणे हा राज्यपालां चा अधिकार असून त्यात मध्यस्थी केली जाऊ शकत नाही. कोणत्या ही परिस्थितीत, अपात्रते चा अर्ज प्रलंबित राहण्याचा याच्या शी काहीही संबंध नाही असं सुप्रीम कोर्टाने च म्हटलं असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हे प्रकरण तातडी ने ऐकावं लागेल असं स्पष्ट केलं आहे. तसंच आजच ५ वाजता सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे. कोर्टा ने अभिषेक मनू सिंघवी यांनी ३ वाजे पर्यंत कागदपत्रं तयार ठेवण्यास सांगितलं आहे.