रुपया घसरला याचा नेमका अर्थ काय? आणि त्याचा आपल्यावर असेच अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

मे च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली आणि रुपया गडगडल्याच्या बातम्या आल्या. चलन बाजारात भारतीय रुपया एकदम नीचांकी पातळीवर आला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ७७ रुपये ५८ पैसे इतका झाला आहे. हा आजवरचा सर्वात नीचांकी दर आहे. यामागचं कारण सांगितलं जातं की अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेने व्याजदरात अर्धा टक्क्याने वाढ केली आहे. याचा परिणाम असा झाला की डॉलरचा दर वाढला आणि भारत, द. आफ्रिका आणि तुर्कस्तान या देशांच्या चलनांच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत पैसे गुंतवण्याचा गुंतवणूकदारांचा निर्णय, रशिया – युक्रेन युद्ध युरोपात पोहोचण्याची भीती आणि वाढीव व्याजदर याचा परिणाम होऊन शेअर बाजार गडगडला; हेच रुपयाच्या घसरणीमागचे कारण सांगण्यात येत आहे.

महागाई कशी वाढते?

आपण समजू की आपल्याकडे आहेत १०० रुपये आणि एखादी गोष्ट अमेरिकेतून मागवायची आहे जिचे मूल्य ७७-७८ रुपये आहे म्हणजे आपल्याकडे २२-२३ रुपये शिल्लक राहतात. पण याआधी ३०-३५ रुपये उरायचे. म्हणजे आता कमी पैसे उरले याचा अर्थ महागाई वाढली आहे.रुपयामध्ये चढ-उतार का होतात?

सौदी किंवा कतार यांच्या रियाल सारख्या अनेक जागतिक चलनांप्रमाणे, डॉलरचा भारतीय रुपयात रूपांतरित होण्याचा दर हा ठराविक नाही. त्याऐवजी, आपल्याकडे बदलती दर प्रणाली वापरली जाते. याचा अर्थ आपले चलन परकीय चलन बाजाराप्रमाणे कमी जास्त होत राहते. मुक्त बाजारातील मागणी आणि पुरवठा विदेशी चलनांसाठी रुपयाचा विनिमय दर ठरवते. साहजिकच डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमतही बदलते.

रुपयाच्या चढ-उतार होण्यावर अनेक घटक परिणाम करतात, जसे की भारतावर असणाऱ्या कर्जाची रक्कम, महागाई दर, व्याज दर, किती लोकांना रोजगार मिळाला तो आकडा, आर्थिक वृद्धी, शेअर मार्केट आणि व्यापारातील तूट इत्यादी. २०२० मध्ये कोरोना उद्रेकामुळे झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून डॉलरचा दर ७६ रुपयांच्या वर गेला होता. पण आताची करणे वेगळी आहेत.

कच्च्या तेलाची किंमत वाढली आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे प्रति बॅरल वाढलेले दर हे देखील रुपयाच्या घसरणीमागचे एक कारण मानले जात आहे. महाग झालेले कच्चे तेल आणि डॉलर बळकट झाल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली आहे, जे आर्थिक दृष्टीकोनातून भारतासाठी चिंतेचे कारण आहे, असे तज्ञांचं म्हणणं आहे. रुपयाच्या घसरणीचा थेट परिणाम होणाऱ्या क्षेत्रांपैकी परकीय व्यापार हे एक क्षेत्र आहे. डॉलर्समध्ये कमाई करणाऱ्या निर्यातदारांकडे आता जल्लोषाचं वातावरण आहे पण, आयातदारांसाठी आणि पर्यायाने भारतीय कुटुंबांसाठी हे चिंताजनक आहे. शेअर मार्केटची चिंताशेअर मार्केटसाठी डॉलर रुपयातील दरी वाढणे अनुकूल नाही आणि शेअर मार्केट कायम डॉलर रुपया दराच्या विरुद्ध – दिशेने जातात. दरम्यान, रुपयाच्या कमकुवतपणामुळे देशांतील सोन्या-चांदीचे दर वाढतात. पण, डॉलरचा वाढता भाव आंतरराष्ट्रीय सोन्यासाठीही प्रतिकूल आहे.

निर्यातीसाठी फायदेशीर काळरुपयाची घसरण झाल्यामुळे निर्यात क्षेत्रांचा, खासकरून माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी कंपन्यांचा चांगलाच फायदा आहे. औषध उत्पादक म्हणजेच फार्मास्युटिकल निर्यातदार, विशेष रसायने आणि कापड यांचाही फायदा होईल. निर्यात क्षेत्रातील शेअरचे दर हे रुपयाच्या घसरणीदरम्यान चांगली उसळी मारतील.सोन्याच्या दरातील घोळसोन्याची किंमत ही डॉलरमध्ये मोजली जाते, डॉलरच्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती कमी होतात. परंतु, रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याची आयात महाग होते यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढतील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

एकंदरीत रुपयाचं डॉलरच्या तुलनेत होणारं अवमूल्यन म्हणजे घसरण ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काहीसा नकारात्मक परिणाम होणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment