राज्यात लवकरच पोलिस भरती; भरली जाणार 7 हजार पदे

पोलिस सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरूणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र पोलिसात लवकरच 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. (Maharashtra police recruitment 2022)

राज्यात पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील 416 पदे तातडीने भरण्यास गृह विभागाने मान्यता दिली होती. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्य़ानंतर पोलिस अधीक्षकांना ही रिक्त पदे भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दीडशे पोलीस शिपाई, 161 पोलीस शिपाई चालक आणि 105 सशस्त्र पोलिसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment