भाड्याने राहायचं की स्वत:चं घर खरेदी करायचं? कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

आपलं स्वत:च घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हा केवळ आर्थिक निर्णय नाही तर भावनिक विषय असतो.

आर्थिकदृष्ट्या प्रगती साधण्यासाठी अनेकजण काही ध्येय ठरवत असतात, यापैकी बहुतांश जणांचा कल हा स्वत:च घर असावं याकडे असतो.

मात्र घर विकत घेत असताना त्याचा आपल्या आर्थिक स्त्रोतांवर परिणाम होणार नाही ना याची काळजी घ्यावी. आपल्या इतर आर्थिक उद्दिष्टांवरही त्याचा परिणाम होऊ नये..

वैयक्तिक आर्थिक योजना तयार करत असताना सर्व आर्थिक उद्दिष्टांनांना समान महत्त्व दिलं गेलं पाहिजे. एकही आर्थिक उद्दिष्ट इतर सर्व उद्दिष्टांपैकी अधिक महत्त्वाचं किंवा कमी महत्त्वाचं नसलं पाहिजे. तसंच आर्थिक टार्गेट्सला भावनिक जोड असू नये.

कोणतं घरं खरेदी करावं आणि त्यासाठी किती पैसे खर्च केले जावेत?

भाड्याचं घर आणि मालकीचे घर याची किती तुलना करावी?

प्रत्येक व्यक्तीची यासंदर्भात वेगवेगळी मतं आहेत. यासाठी कोणत्या प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये हे पाहूया.

घर खरेदी करताना ते आपण कसे वापरणार आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे.

1. घर स्वत:ला राहण्यासाठी खरेदी करायचं की गुंतवणुकीसाठी?

उदाहरणार्थ, तुम्ही राहण्यासाठी घर खरेदी करणार असाल तर ते तुमच्या कार्यालयाच्या आणि मुलांच्या शाळेच्या जवळ असायला हवे. पण जर आर्थिक गुंतवणूक म्हणून घर खरेदी करणार असाल तर रिअल इस्टेटचा आढावा घेऊन घ्यावे. गुंतवणुकीसाठी घेणार असल्यास गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत असल्यास ते पुरेसे आहे.

2. पाच वर्षांनंतर…

घर खरेदी करत असताना आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या पाच वर्षांत घराच्या परिसरात काय बदल होतील. आधीपासूनच विकसित असलेल्या घर खरेदी केल्यास जमिनीची किंमत स्वाभाविकपणे वाढणार. त्यामुळे गुंतवणुकीसाठी घर खरेदी करत असल्यास पुढील पाच वर्षांत परिसराचा किती विकास होणार याचा विचार करणं गरजेचं आहे. सरकार त्याठिकाणी कोणता विकास प्रकल्प सुरू करणार आहे का किंवा काही खासगी कार्यालय किंवा विकासकामं तिथे सुरू होणार आहेत का? या सर्व बाबी घर खरेदी करण्यापूर्वी तपासल्या पाहिजेत.

3. घराची कमीत कमी किंमत:

आपल्या देशात घरांच्या किमतीत जागेनुसार लक्षणीय फरक दिसतो. मुंबईत हिरानंदानी परिसरात एक स्क्वेअर फूट जागेची किंमत 1 लाख रुपये असेल.

घरांच्या कमी-जास्त किमतींचे नेमके निकष काय असतात? हा एक किचकट विषय आहे असं आपल्याला वाटतं. पण जर आपण साधं तत्व पाळलं तर हा गोंधळ दूर होऊ शकतो.

आपण घराच्या वार्षिक भाड्याच्या रकमेचा 20 ने गुणाकार केला तर ती किंमत घराची किमान किंमत असेल. त्या किमतीच्या आधारावर घराची किंमत जास्त आहे की कमी हे आपण ठरवू शकतो.

किमान किमतीपेक्षा घराची किंमत जास्त सांगितली जात असल्यास त्याची काही कारणं असू शकतात. विकासक प्रतिष्ठित असू शकतो, वीज कनेक्शनचे बॅक अप, गॅस लाईन उपलब्ध असणं आणि अशा काही आधुनिक सुविधा असू शकतात.

उदा. समजा जर घराचं महिन्याचं भाडं 15 हजार आहे. तर वार्षिक भाडं 1 लाख 80 हजार रुपये असेल. या किमतीचा 20 ने गुणाकार केल्यास किंमत 36 लाख रुपये होईल. म्हणजेच त्या घराची किमान किंमत ही 36 लाख रुपये आहे.

4. बांधकाम पूर्ण झालेलं घर की बांधकाम सुरू असलेलं घर?

अनेक बांधकाम कंपन्या बांधकाम सुरू असलेलं घर कमी किमतीत ऑफर करतात. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं वाटत असलं तरी काहीवेळा बांधकाम अडकण्याची शक्यता असते.

नोएडा आणि गुरुग्राम शहरांमध्ये अगदी प्रतिष्ठित विकासक सुद्धा केलेल्या करारानुसार म्हणजेच सांगितलेल्या वेळेत बांधकाम पूर्ण करू शकलेले नाहीत. यामुळे ग्राहकांना नुकसान होतं. आता RERA कायद्यानुसार, याची शक्यता कमी झाली आहे.

5. भाड्याचं घर की स्वत:चं घर?

हा मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. भावनिक न होता या विषयाकडे केवळ आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर आपल्याला आधी पहावं लागेल की भाड्याचं घर चांगलं की खरेदी केलेलं घर. खालील मुद्यांच्या आधारे आपण हे ठरवू शकतो,

सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की स्वत:च घर खरेदी करताना किती गोष्टींचा खर्च आहे.

घर खरेदीचा करार करताना पैसे द्यावे लागतात. सहसा ही रक्कम घराच्या किमतीच्या 10 टक्के एवढी असते.

कर्जावरील व्याज सध्या 7 टक्के आहे.

रजिस्ट्रेशनसाठी येणारा खर्च. इंटिरिअरसाठी येणारा खर्च. या किंमतींबाबत स्वतंत्र विचार करावा लागेल कारण अनेक बँका यासाठी अधिकचे व्याज लागू करतात. घराच्या कर्जासाठी (Home Loan) जे व्याज सांगितलं जातं ते यासाठी लागू होत नाही.

भाड्याच्या घरासाठीचा खर्च आणि खरेदीचा खर्च आपण तुलना करूया.

उदा. समजा एका कुटुंबाचं महिन्याचं भाडं 20 वर्षांसाठी 15,000 रुपये आहे.

वार्षिक वाढ 6% वार्षिक वाढ 8% वार्षिक वाढ 10%

सध्याचं भाडं

Rs 15,000 71,98,691 90,75,126 1,15.20,420

भाडे वाढ ही सर्व भागांमध्ये एकसमान नसते. त्यामुळे अतिरिक्त खर्चाची टक्केवारी त्यानुसार मोजावी लागेल.

आता आपण पाहूया की, 20 वर्षांत आपण 50 लाख रुपयांच्या घरासाठी किती किंमत मोजली.

घराची किंमत: 50 लाख वार्षिक व्याज 7% वार्षिक व्याज 8%

सुरुवातीचे पेमेंट (20%) 10,00,000 10,00,000

बँकेचे एकूण कर्ज 40,00,000 40,00,000

20 वर्षांसाठीचं एकूण व्याज34,42,841 40,29,824

रजिस्ट्रेशन 4,00,000 4,00,000

इंटिरिअर डिझाईन (10%) 5,00,000 5,00,000

एकूण 93,43,841 99,29,524

आपण जर 50 लाख रुपयांचं घर खरेदी करत असू तर पुढील 20 वर्षं त्यावर होणारा खर्च 1 कोटी रुपये असेल. आता आपण खरेदी केलेल्या घराचा एकूण खर्च आणि भाड्याचा खर्च यांची तुलना करू शकतो आणि त्यानुसार अधिक फायदेशीर काय आहे हे ठरवू शकतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment