प्रसिद्ध उद्योजक वॉरन बफेंची दिनचर्या नक्की कशी आहे?

काही व्यक्तिमत्त्व विशेष प्रसिद्ध होतात त्यामागे नक्की काय कारण असावं? कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि मेहनत या गोष्टींच्या जोरावर ती यशस्वी होतातच पण या सगळ्यांच्या मागेसुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे या व्यक्तींची दिनचर्या. जो व्यक्ती आपली दिनचर्या व्यवस्थितपणे पार पाडतो त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणूनच या लेखात आपण यशस्वी अमेरिकन उद्योजक आणि जगाला शेयर मार्केटचा मंत्र देणारे वॉरन बफे यांची दैनंदिन दिनचर्या जाणून घेणार आहोत.

वॉरन बफेंची दिनचर्या रात्री ८ तासांची झोप घेतल्यानंतर साधारणपणे सकाळी ६.४५ वाजता सुरू होते. कॉफी, चहा किंवा अगदी पाण्याऐवजी बफेंची सकाळ कोकचा कॅन पिऊनच होते. कोकमधील कॅलरीज बर्न करण्यासाठी व्यायाम करणे ते पसंद करतात. भरपूर व्यायाम करणे, शरीर तंदरुस्त ठेवणे वॉरन बफेंना सर्वात जास्त आवडते. व्यायामामुळे, योगासनामुळे माणसाचे शारीरिक आणि मानसिक संतुलन व्यवस्थित राहते, या संकल्पनेवर त्यांचा प्रगाढ विश्वास आहे.

सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यावर बफे नाश्ता करण्यावर भर देतात. नाश्ता भरपेट असावा या मताचे वॉरन बफे आहेत. ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर मॅकडोनाल्डजवळ थांबून तेथील पदार्थ खाणे देखील त्यांना आवडते. परंतू ज्यावेळी त्यांचा मूड बिघडतो किंवा रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यावेळी मुड चांगला करण्यासाठी वेगळ्या पदार्थावर ताव मारायला ते अजिबात विसरत नाहीत. नाश्त्यात मुख्यतः खारवून वाळवलेले मांस, अंडी आणि चीज बिस्कीट खातात. अशाप्रकारचा आहार घेण्याचे कारण विचारले असता बफे सांगतात की, “सगळ्यात कमी मृत्यूदर हा सहा वर्षाच्या मुलांमध्ये असतो. त्यामुळे ते लहान मुलासारखा आहार घेणे पसंद करतात.

योग्य आहार घेतल्यानंतर ते त्यांच्या ऑफीसमध्ये जातात आणि ऑफिस मधला बराचसा वेळ हा वाचन करण्यातच घालवतात. ऑफिसमधील कामकाज बघणे, कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे याचा देखील समावेश त्यांच्या दिनचर्येत होतो. आर्थिक उलाढालीतील जवळपास ८०% रक्कम ते बिझनेस रिपोर्ट, वर्तमानपत्रे, पुस्तकांचे साहित्य घेण्यातच खर्च करतात. याशिवाय त्यांचा दिनक्रम ते अगदीच काटेकोरपणे पाळतात. वेळेवर नियंत्रण ठेवणे, लोकांना वेळ देणे या गोष्टी ते कटाक्षाने करतात. तसेच ज्या दिवशी आणि ज्या वेळी मीटिंग ठरली असेल त्याचवेळी ती मीटिंग घेण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. वेळेवर पोहचणे आणि वेळेत काम संपवणे यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते.

ज्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत त्याबद्दल अगदीच मोकळेपणाने ते बोलतात. तर ज्या गोष्टी आवडतात त्यांचे कौतुक देखील करतात. काम करण्याची पद्धती, आहार याकडे जातीने लक्ष देणारे बफे स्वतःचे मनोरंजन करण्याला देखील तेवढेच महत्व देतात. काम संपवून घरी परत आल्यावर थोडासा विरंगुळा करून ते रात्रीचे जेवण कुटुंबासमवेत घेतात. तसेच रात्री थोडासा शांततेत वेळ घालवून बाहेरच्या हवेत फिरतात व झोपताना पुस्तकाचे किमान एक तरी पान वाचतात आणि मगच झोपतात.

एक सुटसुटीत, उत्तम दिनचर्या असली की सगळेच काम वेळेवर होते. त्यामुळे घाईगडबड, चिडचिड होत नाही. तसेच सर्व काम व्यवस्थित पार पाडल्याचे समाधान देखील मिळते. तर अशी एकूणच वॉरन बफे यांची ही रोजची दिनचर्या आहे. जे ती व्यवस्थितपणे, न चुकता पार पाडण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सुद्धा तुमच्या वेळापत्रकानुसार कामाची, आहाराची तसेच आवडीनिवडीला प्राधान्य देऊन दिनचर्या तयार करा आणि ती पाळण्याचा पूरेपूर प्रयत्न करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा.

Sharing Is Caring:

Leave a Comment