पोलिस केसचा सरकारी कर्मचाऱ्याच्या नोकरीवर परिणाम होतो काय?

सरकारी कर्मचाऱ्याच्या मनामध्ये सदैव एक भिती असेत कि, जर त्याच्यावर काही पोलिस कारवाई झाली तर त्याच्या नोकरीवर गदा येईल का ? जर आपण सरकारी नोकरी मध्ये असाल आणिआपल्यावर पोलिसात एफ. आय. आर. दाखल झाला तर काय करावे ? ह्या मध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे कि, एफ.आय.आर.कोणत्या कलमाखाली दाखल झाला आहे ? जर एखाद्या गंभिर प्रकरणात, ज्यामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, एफ.आय.आर. दाखल झाला असेल तर आपणास त्वरित सेवेतून निलंबित केले जाण्याची श्यकता असते किंवा विभागीय चौकशी चालू केली जाऊ शकते. तसेच आपणास कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात, तो गंभिर असो किंवा नसो,जर पोलिसांनी अटक केली असेल तरी सुद्धा आपल्यावर उपरोक्त दोन्ही प्रकारच्या कारवाईची शक्यता असते.

दुसरी गोष्ट म्हणजे जर आपली शासकिय सेवेसाठीनिवड झाली असेल आणि फक्त नियुक्ती व्हायची बाकी असेल, अशा वेळेस आपल्यावर यापूर्वीच जर एखादा गुन्हा दाखल झालेला असेल तर त्याची माहिती नियुक्ती देणाऱ्या विभागास कळविणे आवश्यक आहे. कारण अशी माहिती जास्त काळ लपून राहात नाही. ती कधी ना कधी शासनाच्या लक्षात येतेच. आणि अशा परिस्थितीत, जरी आपली नियुक्ती झाली असेल आणि नंतर शासनाच्या निदर्शनास ही बाब आली असेल तर आपली नियुक्ती रद्द होउ शकते. तसेच जर नोकरीत असताना आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला आणि आपणास अटकन होता तात्काळ जामिन मंजूर झाला असेल तर अशा परिस्थितीत आपण, आपला या गुन्ह्यात काही सहभाग नसेल तर, तसे शासनास सांगु शकता. अशा वेळेस न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत आपणावर कोणतीही कारवाई न होण्याची श्यकता असते.

दुसरी परिस्थिती म्हणजे जर आपणास पोलिस विभागात किंवा सैन्यामध्ये नोकरी करायची असेल आणि जर आपणावर आधिच एखाद्या गुन्ह्यात तो गंभिर असो किंवा नसो, एफ.आय. आर. दाखल झालेला असेल आणि आपणास अटक झालेली नसेल तरी सुद्धा आपणास नियुक्ती मध्ये अडचण येण्याची शक्यता असते. कारण पोलिस किंवा सैन्यदलातील सेवा ह्या अति संवेदनशिल सेवा म्हणून गणल्या जातात. त्या मध्ये शिस्त व सचोटीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. घ्या दोन्ही सेवेमध्ये कार्यरत असताना सुद्धा आपणावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर आपणास निलंबित केले जाऊ शकते. आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर सेवेतून बडतर्फ सुद्धा केले जाऊ शकते. तसेच हुंडा विरोधी कायदा व घरगुती हिंसाचार विरोधी कायद्यांतर्गत जर आपणावर एफ. आय.आर.दाखल झाला असेल तर या गुन्ह्यामध्ये शिक्षा जास्त असल्याने निलंबनाची कारवाई होउ शकते.

अशा प्रकारे सरकारी सेवेत कार्यरत असताना फार दक्ष राहून काम करावे लागते. कारण बऱ्याच वेळेस आपला काहीही गुन्हा नसताना आपल्या हीतशत्रूकडून आपणास खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळेस विचलित न होता , त्या प्रसंगास धीराने सामोरे गेले तर आपण त्यातून सहीसलामत बाहेर पडू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment