पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीमध्य व्यवसाय कसा करावा? कायदेशीर करार कसा करावा?

या लेखामध्ये आपण बघणार आहोत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतांना कोणती काळजी घेतली पहिजे पार्टनशिपची नोंदणी कशी करावी, यशस्वती पार्टनरशिप कशी करावी. कायदेशीर करार कसा करावा? नफ्याचे तसेच तोटा झाल्यास तोट्याची विभागणी कशी करावी.
पार्टनरशिपसाठी इंडियन पार्टनरशिप ऍक्ट १९३२ उपलब्द आहे.
या ऍक्टनुसार पार्टनरशिपची सोप्या भाषेत व्याख्या पुढील प्रमाणे  होईल-
जेव्हा २ किंव्हा अधिक लोक एका सामान उद्देशाने एकत्र येऊन १ व्यवसाय सुरु करतात त्याला पार्टनरशिप म्हणतात. तसेच त्यांच्यात झालेल्या कराराला पार्टनरशिप डीड असे म्हणतात.

पार्टनरशिप डीडमध्ये खालील गोष्टींचा समावेश असावा.

  1. व्यावसायाचे किंवा फर्मचे नाव.- उदा. A आणि B मिळून दिवाळीमध्ये एक फटाक्यांचे दुकाण टाकणार आहेत तर त्या फटाक्यांच्या दुकाणाचे नाव त्यांनी “Maharashtra Fireworks” असे ठेवले आहे.
  2. व्यवसाय सुरू करण्याचा उद्देश- यामध्ये कोणत्या वस्तू किंवा सर्विस आपण देणार आहोत याची पुर्ण माहिती येईल. उदा. A आणि B यांनी सुरू केलेल्या व्यवसायामध्ये ते फटाके विकणार आहेत. त्याच सोबत ते दिवाळीचे कंदील आणि लाईटिंग विकणार आहेत. 
  3. व्यवसायाची स्थळ/जागा- यामध्ये व्यवसाय कोठे सुरू करणार आहे याची माहिती दिली पाहीजे. तसेच जर व्यवसायाचे स्थळ एका पेक्षा अधिक असल्यास त्यातील एका स्थळाला मुख्यालय आणि इतर स्थळांना शाखा घोषीत करू शकतो.
  4. पार्टनरशिपचा कालावधी- पार्टनरशिप डीड करतांना हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये पार्टनरशिपचा कालावधी किती आहे तो नमुद करावा. उदा. सदर पार्टनरशिप ही 1 वर्ष/2वर्ष/5 वर्ष राहील.
  5. गुंतवणूक- पार्टनरशिप डीड करतांना कोण किती गुंतवणूक करणार आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा आणि शेवटी दोघांची मिळून किती रक्कम होत आहे याचा उल्लेख असवा. उदा. A आणि B मिळून एक व्यवसाय सुरू करणार असतील तर त्यात A ची रक्कम 70,000 आहे आणि B ची रक्कम 30,000 आहे. गुंतवणूकीमध्ये दोघांचा हिस्सा 70:30 या प्रमाणात आहे.
  6. नफा/तोट्याचे वितरण- व्यावसायात होणाऱ्या नफा/तोट्याची कशा प्रकारे विभागणी होईल याचा स्पष्ट उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करणे आवश्यक आहे. नफा/तोटा हा समप्रमाणात विभागजीत होईल किंव्हा किती टक्यांमध्ये होईल हे स्पष्ट असावे.
  7. कर्तव्य आणि जबाबतदारी- हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये कोणत्या व्यक्तिचे कोणते काम असेल याचा उल्लेख असावा.
  8. मानधन- बऱ्याच वेळेस पार्टनरशिप ही पगारावर देखील असते, तसे असल्यास पगार किती असावा याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करावा.
  9. विस्तार- व्यवसाय हा कालांतराने वाढत असतो. अशा वेळेस नवीन पार्टनर घेण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळेस नवीन पार्टनर घेण्याच्या अटी काय असतील याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असावा. तसेच जुन्या पार्टनरला पार्टनरशिपमधून बाहेर पडायचे असल्यास त्यासाठी काय प्रोसेस असेल हे स्पष्ट करावे. एखादा पार्टनर त्याचे काम व्यवस्थीत करत नसेल तर त्याला कशाप्रकारे काढू शकतो त्या प्रोसेसचा उल्लेख असावा. हा मुद्दा थोडा किचकट आहे परंतु, माठा व्यावसाय असेल किंव्हा 2 पेक्षा जास्त पार्टनर असतील तर मुद्दा ठेवावा.
Sharing Is Caring:

Leave a Comment