डोमिसाईल म्हणजे काय?

आपल्याला डोमिसाईल म्हटले की त्यासाठीच्या घालाव्या लागणाऱ्या फेऱ्या व कष्ट आठवतात. मात्र डोमिसाईल म्हणजे काय हे मात्र लक्षात घेत नाही. नागरिकत्व (राष्ट्रीयत्व) निश्चित करणारे प्रमुख दस्तऐवज म्हणजे डोमिसाईल. यात भारताच्या कोणत्याही राज्यात तुम्ही किमान १५ वर्षे रहिव सी असाल तर त्या राज्याचे मतदार म्हणून तुम्हाला फायदे घेता येतात. हे खास करून सरकारी नोकरी, सरकारी पुरस्कार, वैद्यकीय व इंजिनिअरिंगच्या प्रवेशाच्या वेळी लागतेच. तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल व १५ वर्षे वास्तव्य असेल व तुम्ही १८ वर्षांवरील असाल तर तुम्हाला डोमिसाईल प्रमाणपत्र मिळते. मात्र तुम्हाला १८ वर्षे पूर्ण झालेली नसतील तर तुमचा व तुमच्या वडिलांचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर वडिलांना व तुम्हाला डोमिसाईल प्रमाणपत्र मिळते. मात्र तुमचा जन्म महाराष्ट्राच्या बाहेर झाला असेल व तुम्ही किमान १५ वर्षे रहिवासी असाल तर तुमचा जन्म जिथे झाला त्या राज्याचे डोमिसाईल रिनोऊंस (सोडून देणे) करण्याचे प्रतिज्ञापत्र करावे लागते व मगच तुम्हाला आपल्या राहत असलेल्या राज्याचे डोमिसाईल प्रमाणपत्र मिळते. मात्र तसे बघायला गेले तर डोमिसाईलचा संबंध राष्ट्रीयत्वाशी येतो. भारतात कायद्यामध्ये कायम वास्तव्य याला खूपच महत्त्व आहे. या कायम वास्तव्यालाच इंग्रजीमध्ये ‘डोमिसाईल’ असे म्हणतात. ‘डोमिसाईल’ या शब्दाची व्याख्या दिलेली नाही. परंतु अर्थाने एखाद्या व्यक्तीचे कायम वास्तव्य ज्या देशात होते तो देश त्याचा डोमिसाईल आहे असे म्हटले जाते.

डोमिसाईलची थोडी अधिक माहिती घेऊया. जिथे तुमचा जन्म होतो त्या देशाचे तुम्ही मुळ डोमिसाईल म्हणजेच ‘डोमिसाईल ऑफ ओरिजिन’ होता. सर्वसाधारणपणे डोमिसाईल हे एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते त्यावेळी त्या व्यक्तीला वडिलांचे जे डोमिसाईल असते तेच त्या व्यक्तीचे डोमिसाईल असते. ज्यावेळी एखादी व्यक्ती अनौरस म्हणून जन्माला येते त्यावेळी तिच्या आईचे जे डोमिसाईल असेल तेच त्या व्यक्तीचे डोमिसाईल असते.

सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती ज्या देशात जन्माला येते, तो देश त्या व्यक्तीचा मूळ डोमिसाईल असे समजण्यात येते. तरीसुद्धा त्याला बरेच अपवाद आहेत आणि बऱ्याच अशा घटना घडतात की त्याच्या वडिलांच्या जन्मावरून एखाद्याचे डोमिसाईल ठरवणे कठीण जाते. उदा.

१) एखाद्या व्यक्तीने विमानप्रवासात अथवा बोटीने प्रवास करताना जन्म घेतला तर त्या व्यक्तीचे डोमिसाईल ठरवणे थोडे कठीण जाते.

२) एखादी व्यक्ती परदेशात राजदूत म्हणून जाते. असे असले तरी त्या व्यक्तीचे डोमिसाईल हे ती व्यक्ती ज्या देशाचे राजदूत आहेत, तो देशच त्या व्यक्तीचे डोमिसाईल असते.

३) डोमिसाईलमुळे प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक दर्जा ठरत असतो.

४) प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व हे त्या व्यक्तीचे राजकीय हक्क निश्चित करत असते.

५) डोमिसाईल ऑफ ओरिजिन किंवा मूळ डोमिसाईलचे वैशिष्ट्य म्हणजे मनुष्य जन्माला आला की ते त्याला आपोआप प्राप्त होते..

६) त्याला त्या व्यक्तीपासून वेगळे करता येत नाही.

७) मूळ डोमिसाईल हे कधीही नष्ट होत नाही.

८) एखाद्या व्यक्तीने देशाचे डोमिसाईल घेतले तर ते जेथपर्यंत अस्तित्वात असते तेथपर्यंत मूळ डोमिसाईल बाजूला राहते. परंतु ज्या वेळी ती व्यक्ती आपल्या देशात (मूळ) परत येते त्या वेळी मूळ डोमिसाईल आपोआप पुनःप्रस्थापित होते. यालाच इंग्रजीमध्ये ‘रिव्हाइव्ह’ असे म्हणतात.

९) प्रत्येक मनुष्याला कोणते ना कोणते तरी डोमिसाईल असतेच. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर कोणीही व्यक्ती विना डोमिसाईल राहू शकत नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment