या लेखात आपण कुळ कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत. मुंबई कुळकायदा हा काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. त्यापूर्वी लाखो जमीन कसणारे शेतमजूर हे मजूर म्हणूनच जन्माला यायचे आणि मजूर म्हणूनच मरायचे. त्यांना हा कायदा म्हणजे संजीवनीसारखा ठरला व या कायद्याप्रमाणे एक तत्त्व रूढ करण्यात आले. ते म्हणजे ‘कसेल त्याची जमीन’ हे होय. त्यामुळे वर्षानुवर्षे एखादी जमीन कसत असेल / मशागत करत असेल तरीसुद्धा तिला कायद्याने कोणताच दर्जा मिळावयाचा नाही. या कुळकायद्याने जमीन कसणारा आता त्या जमिनीचा मालक होऊ शकतो. अर्थात या कायद्यामुळे कित्येक लोक एका दिवसात भूमिहीन बनले. कित्येक लोक रस्त्यावर आले. म्हणूनच या कायद्याचेदेखील भान शेतकरी बंधूंनी ठेवणे आवश्यक आहे. अर्थात कुळ म्हणून लागलेला कुळ हा ती जमिनीचा मालक ठरत नाही. तो ती जमीन परस्पर विकू शकत नाही हेही वाचकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
कुळ व कुळवहिवाट यासाठी कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? ● कुळाचा मृत्यू आणि त्यानंतरची वहीवाट एखादे कुळ मरण • पावल्यास त्या कुळाने ज्या अटी-शर्तीवर कुळवहिवाट चालवली होती त्याच अटी-शर्तीवर मयत कुळाच्या वारसाला किंवा वारसांना कुळवहिवाट चालू ठेवण्याचा अधिकार आहे. आता यासंबंधीचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया.
१) कलम ४० मध्ये कुळाच्या मृत्यूनंतर कुळवहिवाट चालू ठेवण्याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. २) सर्वसामान्यपणे कुळवहिवाट ही वारसाहक्काने प्राप्त होते.
३) कुळाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीव्यतिरिक्त जमिनीची कुळवहिवाट अन्य वारसांकडे गेली असल्यास त्या जमिनीच्या येणाऱ्या नफ्यातून त्याच्या विधवा स्त्रीला पालनपोषणासाठी पैसे द्यावे लागतात. थोडक्यात म्हणजे मयत कुळाच्या विधवा पत्नीच्या पालनपोषणाचा भार हा त्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर राहतो.
४) हिंदू विधवा स्त्रीने पुनर्विवाह केला असल्यास मात्र तिला आपल्या पहिल्या नवऱ्याच्या कुळवहिवाटीची वारस म्हणून राहता येत नाही.
५) संरक्षित कुळाने जमिनीचा कब्जा घेतला असेल तर तो मात्र वारसाहक्काने चालू राहत नाही, अशा प्रकारची तरतूद कलम ३७ मध्ये करण्यात आली आहे. कलम ३७ मध्ये जमीनमालकाने एखाद्या कुळाकडून जमीन कसण्यासाठी परत घेतली आणि एक वर्षाच्या आत कसली नाही तर त्याला त्या जमिनीचा कब्जा हा पुन्हा कुळाकडे द्यावा लागतो.
६) कलम ३२ (१ब) च्या अनुषंगाने मिळणारे लाभ हे वारसानादेखील आपोआप प्राप्त होतात. या साऱ्या तरतुदींवरून एखाद्या कुळाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुळकायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनीची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते हे लक्षात येईल.
एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार हा. तहसीलदार (मामलेदार) ना देण्यात आलेला आहे. हा अधिकार कुळकायद्याच्या कलम ७० ‘ब’ अंतर्गत देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट मुख्यत्वेकरून लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे मामलेदारांना कुळवहिवाटीसंबंधी एखादा मनाई हुकूम देण्याचा अधिकार नाही.
कुळ व कुळवहिवाटीसंबंधी तसेच कुळ कोणाला मानले जाईल? कुळ कायद्याबद्दल माहिती :
मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत येणाऱ्या शब्दांच्या व्याख्या आप पाहिल्या. यानंतर आपण कुळकायद्यामधील तरतुदी अशी महत्त्वाची माहिती करून घेणार आहोत. हे सर्व पाहत असताना कोणत्या कलमांअंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे हे देखील आपण पाहणार आहोत. हे करत असताना एक गोष्ट आपण मुद्दामहून लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायदा १८८२ मधील प्रकरण ५च्या तरतुदी या अधिनियमाप्रमाणेच असतील. त्या दोन्ही तरतुदी एकमेकांना पुरक असतील तेथपर्यंत त्या कुळवहिवाट व जमिनीच्या पट्ट्यांनादेखील लागू होतील. मात्र कुळकायद्यातील तरतुदीशी विसंगत असणाऱ्या कुठल्याही तरतुदी कुळवहिवाट आणि जमिनीच्या पट्ट्यांना लागू होणार नाहीत.
कुळकायद्यामधील महत्त्वाची भूमिका असते ती जमीनमालक आणि कुळे यांची. म्हणूनच कुळकायद्यामध्ये ‘कुळ’ म्हणून ज्याला मानले जाते त्याला फार महत्त्व आहे. म्हणूनच कुळासंबंधीची व्याख्या आपण पाहिली असली तरीसुद्धा या ठिकाणी त्यासंबंधी थोडी विस्ताराने माहिती करून घेऊया. ‘कुळ’ कोणाला मानायचे यासंबंधीची माहिती मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ च्या ४ मध्ये देण्यात आलेली आहे. स्वत:ची मालकी नसलेली परंतु कायदेशीररीत्या ती कसत असणारी व्यक्ती म्हणजे सर्वसाधारणपणे ‘कुळ’ म्हणून गृहीत धरण्यात येते.
मात्र कुळ म्हणून मानण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. कुळ कायद्याबद्दल माहिती पुढीलप्रमाणे-
१) कुळ म्हणून मानण्यात येणारी व्यक्ती ही जमीनमालकाच्या कुटुंबीयांपैकी असता कामा नये. २) एखादी व्यक्ती जर जमीनमालकाकडे ‘नोकर’ म्हणून काम करत
असेल तर तिला कुळ म्हणून म्हणता येणार नाही.
३) एखादया व्यक्तीच्या ताब्यात एखादी जमीन जर ताबेगहाण तत्त्वावर असेल तर अशी व्यक्तीदेखील कुळ म्हणता येणे शक्य नाही. ४) एखाद्या सक्षम अधिकाऱ्याने एखादी व्यक्ती कुळ नाही असे
घोषित केले असेल तर ती व्यक्तीदेखील कुळ मानता येणार नाही.
५) जमीन कसणारी व्यक्ती जर जमीनमालकाची नातेवाईक असेल तर
तिला कुळ म्हणून मानण्यात येत नाही.
६) साठेकरार केल्यावर त्या करारानुसार ताबा घेऊन एखादी व्यक्ती एखादी जमीन कसत असेल तर अशा व्यक्तीला कुळ म्हणून मानले जाणार नाही.
७) एखाद्या विधवेने आपल्याला पोटगीदाखल मिळालेल्या जमिनीमध्ये कुळ म्हणून आणले तर अशी आणलेली व्यक्ती कुळ म्हणून मानण्यात येते.