कर्जाचे हप्ते थकले असतील किंवा फेडता येत नसेल तर घाबरु नका, जाणून घ्या तुमचे अधिकार

अनेकजण आपल्या घरासाठी किंवा कार खरेदी करण्यासाठी कर्ज (Bank Loan) घेतात. परंतु, काहीवेळा प्रतिकूल परिस्थितीमुळं आपण हप्ते भरू सकत नाही. त्यानंतर मग बँक किंवा रिकव्हरी एजंटकडून हप्ता भरण्यासाठी दबाव आणला जातो. यामुळं बरेच लोक घाबरतात किंवा डिप्रेशनचे शिकार होतात. जर आपलीही अशीच काहीशी परिस्थिती असेल आणि आपण हप्ते भरण्यास सक्षम नसाल तर घाबरून जाण्याची गरज नाही.

आपण कर्जासाठी एखादी वस्तू गहाण ठेवली असली तरी आपल्याला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. हे मात्र खरं आहे की, आपण कर्ज भरले नाही तर आपल्या मालमत्तेचा बँकेमार्फत लिलाव केला जावू शकतो किंवा कारवाई होते. सिक्युरिटीकरण आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज अंमलबजावणी कायद्यानुसार कर्ज देणारा व्यक्ती/संस्था तारण ठेवलेल्या मालमत्ता जप्त करू शकतात.

परंतु, तुम्हाला माहिती आहे का? की बँकांना देण्यात आलेल्या हक्कांबरोबरच तुम्हालाही काही हक्क मिळाले आहेत. जे बॅंकला कोणतीही कारवाई करण्यास प्रतिबंधित करतात. या अधिकारांमुळे, बँक आपल्याला धमकी देऊ शकत नाही किंवा आपले शारीरिक नुकसान करू शकत नाही. अशा परिस्थितीत, कर्ज घेतल्यानंतर आपल्याला कोणते-कोणते हक्क मिळतात, हे देखील आपल्याला माहीत असले पाहिजे आणि जर आपण कर्ज भरण्यास सक्षम नसाल तर आपण त्यांचा वापर करू शकता.

तुम्हाला भरपूर वेळ दिला जातो

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमांनुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याला बराच वेळ दिला जातो. प्रथम, बँकेकडून आपल्याला बर्‍याच नोटीस बजावल्या जातात आणि कर्ज वसुली एजंट तुम्हाला कर्ज परत करण्यासाठी वेळही देईल. प्रथम आपल्याला अनेक नोटीसा बजावल्या जातात आणि नंतर आपली मालमत्ता विक्री करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर सार्वजनिक नोटीस दिली जाते.

कोणीही धमकावू शकत नाही

आपण कर्ज देण्यास सक्षम नसल्यास कोणताही बँक कर्मचारी आपल्याला धमकावू किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकत नाही. तसेच, आपल्याशी सामाजिक आणि सार्वजनिकरित्या गैरवर्तन करू शकत नाही. ते कदाचित काही तृतीय पक्षाच्या लोकांना वसुलीसाठी आपल्याकडे पाठवू शकतात, परंतु ते केवळ आपल्याला कर्ज परत करण्यास सांगू शकतात. तसेच हे लोक फक्त दिवसा आपल्याकडे येऊ शकतात आणि रात्री आपल्याकडे येऊ शकत नाहीत.

मालमत्तेचे पूर्ण मूल्य मिळविण्याचा अधिकार

जर आपली मालमत्ता विकली जात असेल तर आपल्याला मालमत्तेची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. असे नाही की बँका आपले पैसे परत मिळवण्यासाठी कमी किंमतीत आपली संपत्ती विकतात. यासाठी तुम्हाला मार्केट रेटनुसार प्रॉपर्टीची किंमत मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे जर तुमचे एकूण देणे 10 लाख आहे आणि तुमच्या गहाण ठेवलेल्या वस्तूची किंमत 20 लाख आहे तर ती विकल्यानंतर बँक केवळ 10 लाख आणि काही कर वजा करून उरलेले पैसे तुम्हाला परत करते.

‘या’ टिप्स फॉलो करुन तुम्ही Home Loan चा EMI कमी करु शकता

वाढत्या महागाईवर (Inflation) नियंत्रण ठेवण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांकडून व्याजदरात वाढ (Home Loan Interest Rates) करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) अचानक रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला. आरबीआयच्या या घोषणेनंतर बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक आणि आयडीबीआयसह अनेक बँकांनी कर्जे महाग करण्याची घोषणा केली. ज्याचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्जाच्या मासिक हप्त्यावर (EMI) होईल. अशा परिस्थितीत, महागड्या कर्जाच्या जमान्यात तुमचा ईएमआय कमी करायचा असेल, तर अशा 5 टिप्स आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात.

प्री-पेमेंट

कर्जाचे EMI कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शक्य तितकं प्री-पेमेंट करणे. जर तुमच्याकडे तुमच्या खर्चाव्यतिरिक्त बचत असेल किंवा तुम्हाला कुठून तरी मोठा निधी मिळत असेल, तर तुम्ही तुमच्या कर्जाचा ईएमआय प्रीपेमेंटद्वारे कमी करू शकता. खरं तर, जेव्हा तुम्ही प्रीपेमेंट करता तेव्हा ती रक्कम थेट मूळ रकमेमध्ये (Principal Amount) कमी होत असते. अशा प्रकारे तुमचा मासिक हप्ता देखील कमी होतो.

कर्जाचा कालावधी वाढवा

अनेक वेळा असे घडते की होम लोन ईएमआयमुळे मासिक खर्चावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न किंवा बचत मिळत नसेल, तर तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवून EMI कमी करू शकता. पण, यात एक तोटा असेल की तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.

कर्ज घेताना व्याजदराची तुलना करा

गृहकर्ज बँक निवडताना नेहमी व्याजदरांची तुलना करा. चांगली डील मिळेल तिथून कर्ज घ्या. बर्‍याच वेळा असे होते की तुम्ही बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे, परंतु इतर बँकेचा व्याजदर कमी आहे, त्यामुळे तुम्ही कर्ज ट्रान्सफर करू शकता. नेहमी सर्वोत्तम डील मिळवा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा कर्ज ट्रान्सफर करा.

चांगल्या व्याजदराबाबत बँकेशी चर्चा करा

बँका कधीकधी ग्राहकांना त्यांच्या चांगल्या रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड आणि सिबिल स्कोअरसह व्याजदरांमध्ये अतिरिक्त सवलत देतात. तुमचा रेकॉर्ड चांगला असेल, तर तुम्ही तुमच्या बँकेशी बोलून गृहकर्जाचा व्याजदर शक्य तितका कमी मिळवू शकता. यामुळे तुमचा EMI कमी होईल.

डाऊन पेमेंट जास्त करा

गृहकर्ज घेताना, डाउन पेमेंट शक्य तितक्या जास्त करण्याचा प्रयत्न करा. याचे कारण म्हणजे 1-2 लाख रुपयांचे जास्त डाउन पेमेंट देखील तुमचा EMI 2-3 हजार रुपयांनी कमी करू शकते. याशिवाय व्याजाचीही बचत होते.

Sharing Is Caring:

3 thoughts on “कर्जाचे हप्ते थकले असतील किंवा फेडता येत नसेल तर घाबरु नका, जाणून घ्या तुमचे अधिकार”

Leave a Comment