उधारीने दिलेले पैसे कसे वसूल करावे? नैतीक तसेच कायदेशीररित्या.

आयूष्यात प्रत्येकाला कधी ना कधी दुसऱ्याला पैसे उधार द्यावे लागतात. बऱ्याच वेळेला आपल्याला असा अनुभव येतो की, पैसे उधार मागते वेळेस माणूस फारच गोड बोलून आपल्याकडून पैसे घेत असतो. पण एकदा का पैसे दीले की, नंतर तो आपल्याला ओळख पण दाखवायला तयार नसतो.

जर आपण सुद्धा अशाच संकटात सापडला असाल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे काही सोप्या पण महत्वपूर्ण गोष्टी आपणास कराव्या लागतील.

  1. सर्व प्रथम पैसे परत मागतांना वाद विवाद टाळावेत.
  2. समोरच्या व्यक्तीच्या त्या वेळेसच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती करून घ्या.
  3. जर त्याची स्थिती खरोखरच चांगली नसेल तर, त्याला सुलभ हप्त्यामध्ये पैसे परत करण्यास सांगा.
  4. पैसे परत मिळवण्यासाठी आपण, आपल्या व त्याच्या कुटूंबाची मदत सुद्धा घेऊ शकतो.
  5. कुटूंबाची मदत सुद्धा उपयोगात येत नसेल तर विविध समाज माध्यमातून (उदा. फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप स्टेटस) आपण त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा. “ह्या व्यक्तीने माझ्याकडून पैसे उधार घेतले असून तो परत करायला तयार नाही.“ अशा आषयाची विधाने वेगवेगळ्या समाज माध्यमातून (सोशल मिडीया) प्रसारीत केल्याने त्याच्यावर नैतीक दबाव येऊन तो आपले पैसे पर करण्याची शक्यता असते. (ही आयडीया नक्कीच कामाला येते, कारण प्रत्येकाला आपली प्रतीष्ठा महत्वाची असते.)
  6. हे सर्व उपाय करून जर आपले पैसे परत मिळत नसतील तर शेवटी आपण कायद्याची मदत घेऊ शकतो. परंतु, त्याअगोदर आपल्याला काही पुर्व तयारी करावी लागते. तुम्ही या व्यक्तीला पैसे दिले आहेत हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुरावे गोळा करावे लागतील. तुम्ही काहीही करून फोनद्वारे किंवा व्हॉट्सॲपवर त्याने आल्याकडून अमूक इतकी रक्कम घेतली आहे हे कसेही करून कबुल करून घेणे आवश्यक आहे. कारण हे इलेक्ट्रॉनिक रेकॉडींग पुढे कोर्टात पुरावा म्हणून उपयोगात येऊ शकते. तसेच पैसे देते वेळेस तिथे कूणी त्रयस्थ व्यक्ती हजर असेल किंवा पैसे दिल्याचे काही लेखी दस्तएवज केले असतील तर त्याचा उपयोग कायदेशीर मदत मागतांना नक्की होऊ शकतो. ह्या पुराव्यांच्या आधारे आपण स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये कलम 420 अंतर्गत फसवणूकीची तक्रार दाखल करू शकतो. ह्याच पुराव्यांच्या आधारावर आपण त्या व्यक्तीवर न्यायालयात दावा सुद्धा दाखल करू शकतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीस तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो किंवा त्याला आपले पैसे परत द्यावे लागू शकतात.

अशाप्रकारे वरील विविध मार्ग वापरून आपण आपले उधारीने दिलेले पैसे नक्कीच परत मिळवू शकतो.

Sharing Is Caring:

1 thought on “उधारीने दिलेले पैसे कसे वसूल करावे? नैतीक तसेच कायदेशीररित्या.”

  1. पहिल्यांदा सांगा याआधारे जर आपल्याला बायकोऩे आपल्याकडील घेतलेले पैसे परत पुन: मागऊन घेता येतात का?

    Reply

Leave a Comment