आरोपी नंबर-2… संजय राऊत हे शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला जबाबदार आहेत का?

काळ होता 1993 नंतर चा. बाबरी पाडण्यात आली होती. या गोष्टी ला प्रत्युत्तर म्हणून देशभरात हिंसाचार उसळला होता. देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील या हिंसाचारा तून वाचली नाही. काही काळा नंतर मुंबई शांत झाली. दंगली ला जबाबदार ठरलेल्या लोकां वर खटले भरू जावू लागले..
अशाच खटल्यां मध्ये एक आरोपी होते बाळासाहेब ठाकरे. राज्यभरात एकूण 140 खटले बाळासाहेबां वर दाखल करण्यात आले होते. शिवसेने चं मुखपत्र असणाऱ्या सामना वर्तमानपत्रातून चिथावणीखोर लिखाण करण्यात आल्याचे हे आरोप होते. राज्यात ल्या एकूण 140 खटल्यामध्ये संपादक म्हणून आरोपी नंबर एक होते ते बाळासाहेब ठाकरे आणि आरोपी नंबर दोन होते सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत.
या काळात आरोपी नंबर दोन म्हणून संजय राऊत बरेच प्रसिद्ध झाले होते. आजही आरोपी नंबर दोन म्हणून संजय राऊत चर्चेत आहेत. पण आजचं कारण वेगळं आहे. आज त्यांच्या वर शिवसेना फोडल्या चा मनमानी केल्याचा, उद्धव ठाकरे आणि इतर नेते अशी दरी निर्माण करण्याचा आरोप आहे.

बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी एक पत्रच जाहीर करत संजय राऊतां वर आरोप केले आहेत. यात ते म्हणतात की, संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारां च्या गळ्या तील ताईत आहेत. तीन पानी असणाऱ्या या पत्राचा प्रमुख रोख संजय राऊत यांच्या वरच आहे.. पण राऊतां वर का आरोप होतायत त्यासाठी खालील मुद्दे पाहणं गरजे चं आहे.
पहिला मुद्दा म्हणजे महा विकास आघाडीची स्थापना..

संजय राऊत हेच महाविकास आघाडी चे शिल्पकार होते. निवडणूक पूर्व झालेली युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महा विकास आघाडीचा निर्णय झाला यामध्ये संजय राऊत यांची भूमिका महत्व पूर्ण होती. संजय राऊतच सेनेची भूमिका शरद पवार यांच्या जवळ मांडत होते. अशी आघाडी करता येवू शकते, हा प्रस्ताव शरद पवारां जवळ संजय राऊतच घेवून गेले होते. महा विकास आघाडी ची स्थापना पर्यायाने पारंपारिक शत्रू असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ची सत्ता मिळवण्या ची गोष्ट बऱ्याच आमदारांना चुकीची वाटतं होती.

याच प्रमुख कारण म्हणजे आज शिवसेने च्या ज्या 39 आमदारांनी बंडखोरी केली आहे त्यातील 13 आमदार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारा चा पराभव करून विजयी झाले आहेत तर 10 आमदार हे काँग्रेस च्या उमेदवारां चा पराभव करून विजयी झाले आहेत, अशा वेळी शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस ही आघाडी या आमदारां ना मतदारसंघात अडचणी ची ठरत आहे. सत्तेत स्थान मिळालं पण पुढच्या पंच वार्षिकला आमदारकी टिकवण सेने च्या या आमदारांना कठीण वाटत आहे.

प्रत्यक्ष मैदानात अडचणी ची जाणारी ही महाविकास आघाडी घडवली ती संजय राऊत यांनी त्यामुळे रडार वर पहिला नाव येतं ते संजय राऊत यांच…

संजय राऊत यांना आरोपी करण्या मागचं दूसरे कारण आहे ते म्हणजे शरद

पवारां सोबत त्यांची वाढलेली जवळीक..

महा विकास आघाडी च्या घडामोंडी दरम्यान संजय राऊतां नी शरद पवाररांच कौतुक करण्यास सुरवात केली. शरद पवार विश्वासू नेते आहेत इथ पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास शरद पवार हेच सब कुछ आहेत इथ पर्यन्त पोहचला. बाळासाहेब ठाकरेंचे आणि शरद पवारांचे संबंध चांगले असले तरी राजकीय पटला वर हे दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक होते. या विरोधातूनच स्थानिक राजकारणां ची बांधणी महाराष्ट्रात झाली. उदाहरण घ्यायचं झालं तर सुहास कांदे यांच्या विरोधात भुजबळ आणि भुजबळां च्या विरोधात सुहास कांदे रुजलं गेलं. अशा वेळी सेनेचे प्रमुख नेते राऊत हे शरद पवारां वर विश्वास टाकत गेले, जवळीक वाढवत गेले. अगदी UPA चे अध्यक्षपद शरद पवारांना द्यावं ही भूमिका किंवा राष्ट्रपती पदा साठी शिवसेने चा पवारांना पाठींबा असल्याची राऊतांची भूमिका. यामुळे शरद पवारांशी जवळीक राऊत वाढवत गेले पण ही गोष्ट सेने च्या आमदारां ना रुचली नाही..

तिसर कारण म्हणजे हिंदुत्वाशी प्रतारणा करण्याचा आरोप..

राऊतां वर होणारा तिसरा आरोप म्हणजे राऊतां नी हिंदूत्वाशी प्रतारणा केली. केसरकर यांनी लिहलेल्या पत्रात 2014 नंतरच्या राजकारणा बाबत टिका केले ली आहे. 2014 ते 2019 च्या काळात संजय राऊत हे भाजप वर टिका करत गेले, त्यातून भाजप व सेनेत वितुष्ट निर्माण झालं. बाळासाहेब ठाकरें नी काश्मीर मधून कलम 370 हटवण्याची भूमिका मांडली. मात्र जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कलम 370 हटवण्यात आलं तेव्हा शिवसेने च्या नेत्यांना या गोष्टींच श्रेय घेता आलं नाही. उलट पक्षी संजय राऊत यांनी कलम 370, सर्जिकल स्ट्राईक या गोष्टी फास्ट फुड सारख्या आहेत अशी टिका केली होती. ही टिका ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली होती.

तेव्हा राज्यात महा विकास आघाडी चे सरकार नव्हते तर भाजप सेना युतीचे शासन होते. युतीत असताना देखील संजय राऊतां नी ज्या टिका केल्या त्या मुळेच भाजप सेनेत अंतर वाढत गेल्याचे आरोप होतात. बंडखोर आमदारा पैकी अनेक आमदारां साठी हिंदुत्व ही पारंपारिक व्होट बँक राहिले ली आहे. अशा वेळी आपली व्होट बँकच संजय राऊत यांच्या स्टेटमेंट मुळे धोक्यात येवू शकते अशी भावना बंडखोर आमदारां मध्ये रुजली गेली.

चौथ कारण म्हणजे, किचन कॅबिनेट चं राजकारण..

किचन कॅबिनेट म्हणजे च आपल्या फेवर मधल्या फक्त दोन-चार लोकां मधूनच राजकारण करणं. अगदी अलिकडचंच उदाहरण घ्यायचं तर सेने कडून राज्य सभेच्या उमेदवाराची घोषणा पक्षप्रमुखांनी न करता संजय राऊत यांनी केली. चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, अनंत गिते अशा नेत्यां ना पाठबळ द्यायचं सोडून राऊत हे मनमानी निर्णय घेत आहेत अशी भूमिका आमदारां ची झाली. हे निर्णय शरद पवारां च्या सोयीचे असतात ही भावना आमदारां च्या रुजत गेली. UPA अध्यक्ष पदाबाबत चा सेनेचा निर्णय असो की उत्तर प्रदेशात निवडणूका लढवण्या चा निर्णय असो राऊतांनी सांगितले.

संजय राऊत हे राज्य सभेचे उमेदवार आहेत. त्यांना लोकांच्या त जावून निवडणूक लढवावी लागत नाही. पण चुकीचे सल्ले उद्धव ठाकरें ना देतात असं मत सेनेच्या आमदारांच झालं.

पाचवं आणि महत्वा चं कारण म्हणजे राऊतां ची वक्तव्ये..

रोज सकाळी 10 वाजता राऊतां च्या विधानाची बातमी ठरलेली असाय ची. एके काळी विरोध असणाऱ्या नवाब मलिकांच समर्थन असो की अनिल देशमुखां ची बाजू लढण्याची कामगिरी असो. संजय राऊत सातत्या ने भाजपवर टिका करत चर्चेत राहिले. दुसरी कडे भाजप कडून देखील संजय राऊत यांच्या वर टिका होत गेली. संजय राऊत ED च्या विरोधात बोलत राहिले पण प्रत्यक्षात ED चा चौकश्यां ना समोरं जावं लागलं ते यशवंत जाधव, प्रताप सरनाईक अशा नेत्यांना.

यशवंत जाधवां च्या पत्नी यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आज बंडखोर आमदारां च्या यादीत आहेत.

भाजपच्या विरोधात राऊत वक्तव्य करतात. त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो अशी भावना या नेत्यां मध्ये तयार होत गेली..

गेल्या अडीच वर्षात ल्या राऊतां च्या वक्तव्यां ची भली मोठ्ठी यादी असली तरी राज्य सभेच्या निवडणूकी नंतर अपक्षां वर दाखवलेला अविश्वास, कालच बंडखोर आमदारां वर तोफ डागताना काही लोक आपला बाप बदलतात, बंडखोर आमदारांचा आत्मा तिथेच राहिल फक्त बॉडी येईल अशी वक्तव्य कुठेतरी ही दरी अजून वाढवतानाच दिसत आहेत.

Sharing Is Caring:

1 thought on “आरोपी नंबर-2… संजय राऊत हे शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला जबाबदार आहेत का?”

  1. अगदी 101% खरे आहे..खर तर सन्मान,आदर,जेष्ठ,श्रेष्ठ, ह्या माणसाला काही माहितीच नाही..एक साधारण पत्रकार…पण केवढा घमंड..जनतेने चांगले चांगले रथी महारथींना त्यांची जागा दाखवली..तो ए किस खेत की मुली है..साहेबांनी प्रवक्ता म्हणून विश्वास दाखवला..पण बेलगाम घोड्याप्रमाणे आपल्या अशील वाणीने अनेकांना त्याने घोडे लावले..व शेवटी जनतेने व लोकप्रतिनिधींनी म.वि.आ. ला घोडा लावलाच..हे याचेच कर्म आहे..बाप काढायचा,लोकांच्या परिस्थितीवर हास्य करायचे,मृतात्मे म्हणायचे,मिमीक्री करायची,हे पदाला शोभत नाही हो यांच्या साहेब फार सरळ व हळव्या स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहेत..याचाच गैरफायदा याने घेतला व शेवटी होत्याचे नव्हते झाले..याला जबाबदार हाच..विश्वासू माणसं पोटतिळकीने साहेबांना विनवित होती..परंतु साहेबांनी लक्ष दिले नाही..ही वस्तुस्थिती आहे..जनतेला सर्व माहिती आहे म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांच्या समर्थनार्थ उभा आहे..साहेब असो अस भावनिक होऊन सत्ता टिकत नसते.त्यासाठी जनतेत लोकराजे होऊन मिसळावे लागते..तेव्हा तो जानता राजा गळ्यातील ताईत बनतो..

    Reply

Leave a Comment