बांधकाम पूर्णत्वाचा दाखला याची माहिती घेताना सर्वप्रथम आर्किटेक्ट नकाशा नियमात राहून व गरजेनुसार तयार करतो. त्या नकाशामध्ये बांधकामाचे स्वरूप मोजमापांसह दिलेले असते. दिशादर्शनासाठी उत्तरेकडील बाण दर्शविलेला असतो. हा बिल्डिंग प्लॅन प्रचलित कायद्यानुसार बनविलेला असतो. सर्व शहानिशा झाल्यानंतरच हा बिल्डिंग प्लॅन संमत होत असतो.
आता संपूर्ण बांधकाम मंजूर प्लॅननुसार झाले आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका या त्रिस्तरीय संस्थांना स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हटले जाते. त्यासाठी स्वतंत्र बांधकाम विभाग अथवा नगरविकास विभाग कार्यरत असतो. त्या विभागातील अभियंते बांधकामाला प्रत्यक्ष भेट देऊन बांधकामाची पाहणी करतात. जादा बांधकाम असल्यास ते बेकायदेशीर ठरवले जाते. मंजूर प्लॅनपेक्षा कमी बांधकाम असल्यास चालते. पण जादा बांधकाम नको. अशा बांधकामाला ‘बेकायदेशीर बांधकाम’ किंवा ‘अतिक्रमण’ असे म्हटले जाते. अशा वेळी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाकारला जाऊ शकतो. बांधकाम हे मंजूर प्लॅनपेक्षा कमी बांधकाम असल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्रदान केला जातो. प्लॅनपेक्षा कमी बांधकाम असल्यास दाखला भागशः दिला जातो. बांधकाम पूर्ण असल्यास पूर्ण दाखला दिला जातो.
2 thoughts on “बांधकाम पूर्णत्वाचा दाखला म्हणजे काय? (information about Possession Certificate in marathi)”