Solar Energy Project सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमीन भाड्याने देऊन मिळवा वर्षाला 50 हजार रुपये… जाणून घ्या सविस्तर माहिती.

Solar Energy Project या प्रकल्पासाठी ज्याप्रमाणे एकूण आवश्यक असलेल्या जमिनीपैकी दहा टक्के जमीन सध्या उपलब्ध झाली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी आणि ग्रामपंचायत यांना जमीन भाड्याने देण्यासाठी वाव आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊ शकतात. वर त्यात सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दरवर्षी 50 हजार रुपये प्रति एकर भाड्या देण्यात येणार आहे आणि या जमीन भाड्यामध्ये दरवर्षी तीन टक्के वाढ सुद्धा करण्यात येणार आहे. या प्रकारची उपायोजना Solar Energy Project या योजनेत करण्यात आलेली आहे. यासाठी अगोदर दहा हजार रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागत होते. ते सुद्धा आता कमी करून एक हजार रुपये करण्यात आलेले आहे. तरी या सर्व संधींचा फायदा घेत शेतकरी आणि ग्रामपंचायत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी याचा पुरेपूर उपयोग करू शकतात.

विविध संधी या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे आणि वैयक्तिक स्तरावर सुद्धा विजेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना वीज उपलब्ध असेल तेव्हा रात्री अवेळी केव्हाही शेतात पाणी देण्यात जावे लागत होते. ती असुविधा शेतकऱ्यांची कुठेतरी कमी होताना दिसत आहे आणि या प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा केव्हाही पिकांना पाणी देण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्याचे कष्ट देखील वाचतील आणि यातून शेतीलाही फायदा होईल. त्यामुळे या योजनेअंतर्गत सहभाग नोंदवणे नक्कीच फायद्याचे ठरेल. Solar Energy Project या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात आणि जर ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकतात.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.