केशरी रेशन कार्डधारकांना 150 रुपयांचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर करावा लागतो. ration 150 rs form download यासाठी खालील दिलेल्या काही कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- तुम्हाला महा ई सेवा केंद्रात जाऊन म्हणायचे आहे की, केशरी रेशन कार्डधारकांना 150 रुपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज आहे, तो अर्ज नमुना द्या. हा अर्ज तुम्हाला महा ई सेवा केंद्रावर मिळून जाई
- रेशन कार्ड झेरॉक्स
- सातबारा व 8 अ उतारा
- बॅंक पासबुक झेरॉक्स
- कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्ड झेरॉक्स
महा ई सेवा केंद्रांतून घेतलेला किंवा इतर ठिकाणांहून घेतलेला अर्जात विचारलेली माहिती भरा. ही माहिती भरणं अगदी सोपं आहे. माहिती भरल्यानंतर, वरील दिलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स जोडा. हे केल्यानंतर हा अर्ज तुम्हाला तहसीलमध्ये सादर करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमच्या बॅंक खात्यावर 150 रुपये जमा होत जातील. अधिक माहितीसाठी तुम्ही तहसील कार्यालयात संपर्क साधा.