PM aavas yojna प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 21 ते 55 वर्ष इतके असले पाहिजे. जर कुटुंब प्रमुख किंवा अर्ज करणाऱ्याचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असेल तर तर त्याचा मुख्य कायदेशीर वारसाचा गृहकर्जामध्ये समावेश केला जातो.
ईडब्ल्यूएससाठी वार्षिक उत्पन्न 3 लाख इतके निश्चित केले आहे. एलआयजीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 ते 6 लाख इतके असावे अशी अट आहे. त्याचप्रमाणे 12 ते 18 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
PM aavas yojna या योजनेच्या लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. पगारदार व्यक्तींसाठी सॅलरी सर्टिफिकेट, फॉर्म १६ किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) तसेच पगारदार व्यक्तींसाठी ज्यांचं २.५० लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे आणि ज्यांचा छोटा व्यवसाय आहे अशा लोकांना उत्पन्नाचा दाखला देता येऊ शकतो. वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास उत्पन्नाचा योग्य पुरावा सादर करणं आवश्यक आहे.
६.५ टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी फक्त ६ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर उपलब्ध आहे.
वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंत कमावणारे लोक ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ४ टक्के व्याजाच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे, १८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना १२ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याजाच्या अनुदानाचा लाभ घेता येईल.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.