Online packing job : घरबसल्या सुरू करा पॅकिंगचे काम आणि घरबसल्या करा ऑनलाईन कमाई! 

Online packing job  सर्वप्रथम तुम्ही सुकामेवा म्हणजे काजू, बदाम, बेदाणे, चिरंजी यांसारखा सुका मेवा जो आरोग्यासाठी फायदेशीर असतो, त्यांची किंमत देखील खूप जास्त असते. जर तुम्हाला पॅकिंग व्यवसाय सुरू करून कमाई करायची असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पॅकिंग व्यवसाय सुरू करून कमाई करू शकतात.

    त्यासाठी तुम्ही तुम्हाला सर्वप्रथम ड्रायफ्रूट म्हणजे सुकामेवा लागेल  तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारातून होलसेल दराने आणि कमी दरात सुकामेवा खरेदी करू शकतात. त्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅकिंग पॉलिथिन आणि मशीनची आवश्यकता असेल. म्हणजे ते तुम्ही ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईट द्वारे खरेदी करू शकतात. तसेच ड्रायफ्रूट्स चे वजन आणि पॅकिंग करण्यासाठी वजन मशीन देखील लागेल, ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

    तुम्ही ही सर्व सामग्री गोळा केल्यावर ड्रायफ्रूट्स चे वजन करून त्याला पॅक करू शकतात  उदाहरणार्थ 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि एक किलो असे वजन करून तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पॅकेटमध्ये पॅक करू शकतात. नंतर तुम्ही हे पॅकेट तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये थोड्या नफ्याने विकून कमाई करू शकतात. जर तुम्हाला ऑनलाईन कमाई करायची असेल तर त्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट वापरून विक्रेता खाते तयार करावे लागेल. जिथे तुम्ही ऑनलाईन साहित्य विकून नफा मिळवू शकतात. तसेच तुम्ही मार्केटमध्ये दुकानदारांनाही तुमचे पॅकिंग केलेले वस्तू विकू शकतात. कारण पॅक केलेले वस्तू घेण्यास दुकानदारांनाही काही अडचण नसते. 

      अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करून कमाई करू शकतात. अशाचप्रकारे तुम्ही मसाले पॅकिंग करून देखील विकू शकतात आणि कमाई करू शकतात.