Map of farm : शेत बांधाच्या लांबी रुंदीचा नकाशा, बघा ऑनलाईन! 

  Map of farm या पोर्टलवर आपल्याला उजव्या बाजूला विविध ऑप्शन बघायला मिळतील. त्यात ई नकाशा, भू नकाशा असा एक ऑप्शन आहे. किंवा महाराष्ट्राचा एक नकाशा पोर्टलवर दाखविलेला आहे. तिथे आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून सुद्धा आपण प्रोसेस सुरू करू शकता. जिल्ह्याच्या ऑप्शन्सवर क्लिक केले की अ, ब, क, ड यानुसार जे गाव पहिले आहे त्यानुसार नकाशा दाखविला जातो. 

     जिल्हा निवडला की तालुका निवडण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर तालुक्यात सर्व गाव दाखवली जातील. त्यातून तुमचं जे गाव आहे ते निवडायचं आहे. गाव निवडल्या नंतर गावाचा नकाशा पूर्णपणे दाखविला जातो. यानंतर विशिष्ट सर्वे नंबरचा नकाशा बघायचा असेल तर सर्वे नंबर वर क्लिक करू शकतात किंवा सर्च या पर्यायात सर्वे नंबर लिहून तो सिलेक्ट करू शकतात. 

      त्यानंतर तो सर्वे नंबरचा भाग लाल रेषेने दाखविला जाईल. त्याबद्दलची सगळी माहिती त्या ठिकाणी दाखविली जाईल. त्यात वरती स्केल नावाचा ऑप्शन आहे. त्या स्केल नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर बांधाची लांबी, रुंदी आपण मोजू शकतात. त्याच बरोबर आपण अक्षांश आणि रेखांश सुद्धा पाहू शकतो. 

    बांधाच्या लांबी रुंदीची जास्तीची लांबी ही ठरवलेली असते. तिचे जमिनीच्या वैशिष्ट्यांनुसार मापन केलेले असते. तसेच, पाण्याची उपलब्धता, शेताचे आकार, नद्या किंवा तलावांची व्यवस्था, पर्यावरणीय परिस्थिती, शेतीची प्रकृती आणि इतर घटकांच्या आधारे शेतीच्या बांधाची लांबी निर्धारित केली जाते. ह्या निकषांसाठी तुम्ही हा नकाशा प्रत्येक जिल्ह्यानुसार बघू शकतात.

    नकाशा डाऊनलोड देखील करता येणार आहे. जेणेकरून त्याला पीडीएफ स्वरुपात सुद्धा सेव्ह करता येईल. हा नकाशा शेत बांधाच्या लांबी रुंदी नुसार, शेतीच्या उद्दीष्टांनुसार जमिनीची आकार, भूमिगत संरचना आणि जलमागाचे वैशिष्ट्य निर्धारित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. उच्च पावसाच्या क्षेत्रात, पाण्याची उपलब्धता पेक्षा कमी पावसाच्या क्षेत्रात अधिक बांधाची लांबी आवश्यक असते. वायूचा नियमित प्रवाह आणि प्राकृतिक रचनेनुसार बांधाची लांबी निर्धारित केली जाते. अशा कित्येक बाबी या नकाशातून निर्धारित होतात. त्यामुळे हा नकाशा असणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे शेतीच्या अनेक भौगोलिक आणि प्राकृतिक गोष्टी जाणून घेणे शक्य होते. त्यानुसार उपाययोजना करणे देखील शक्य होते.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.