सर्वप्रथम बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेच्या https://bankofmaharashtra.in/savings-account या अधिकृत वेबसाईटवर जा.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर, ‘Open Saving Account’ पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. येथे ‘Lets Go’ या पर्यायावर क्लिक करा.
आता भाषा निवडण्यासाठी पर्याय येईल, त्यामधून भाषा निवडून घ्या आणि ‘Next’ बटणावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
अर्ज भरल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
फॉर्ममध्ये आपण ई-मेल दिलेला असतो. तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर कस्टमर आयडी मिळेल, त्याची प्रिंट काढून ठेवावी.
ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर, आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन आपण निवडलेल्या बॅंक शाखेत जमा करावी.
यानंतर तुम्हाला बॅंकेत जावे लागेल. बॅंकेतून तुम्हाला पासबुक आणि ATM कार्ड दिल्या जाईल.