Maha egram app यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून महा इ ग्राम सिटीजन ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यात तुम्हाला तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी संपूर्ण माहिती भरावी लागेल. संपूर्ण माहिती भरल्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड लॉगिन करावे लागेल. त्यानंतर ॲप मध्ये दिलेल्या कागदपत्रकांच्या ऑप्शन वर क्लिक करून मागितलेली माहिती भरून तुम्हाला हवे ते कागदपत्र येथून मिळू शकतात. या सर्व कामांसाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. शहरात राहणाऱ्या लोकांना ही सर्व कागदपत्रे मिळवण्यासाठी परत गावी जाण्याची आणि वेळ घालवण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या मोबाईल ॲपवरून ही सुविधा आता नागरिकांना मिळणार आहे.
ग्रामपंचायत मिळणाऱ्या प्रमाणपत्राकरिता नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन प्रमाणपत्र किंवा दाखले आता मिळू शकणार आहे.
गुगल प्ले स्टोअर ओपन करून महा इ ग्राम Maha egram app सर्च करा. त्यानंतर तुम्हाला महा इ ग्राम सिटीजन ॲप असे अधिकृत एप्लीकेशन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्या आणि त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत मधील सर्व दाखले मिळू शकतात.
mahaegram Citizen App च्या माध्यमातून आता कागदपत्र मिळवण्याचे अनेक अडथळे आता दूर झालेले आहेत. आता कागदपत्र मिळवण्यासाठी जास्त फिरण्याची गरज नाही. एका क्लिकमध्ये कागदपत्र घर बसल्या मिळू शकतात. त्यामुळे नागरिकांसाठी केल्या गेलेल्या या उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा.
हे देखील वाचा-