Land Purchase Act तर पश्चिम बंगालमधील जास्तीत जास्त 24.5 एकर जमीन खरेदी करता येते. त्यानंतर हिमाचल प्रदेश मध्ये 32 एकर जमिनी खरेदी करू शकतात. तर कर्नाटक मध्ये 54 एकर जमीन खरेदी करता येऊ शकते. कर्नाटक मध्ये देखील महाराष्ट्र सारखेच नियम लागू आहेत. उत्तर प्रदेशात एक व्यक्ती 12.1 लागवड योग्य जमीन खरेदी करू शकते. तर बिहारमध्ये फक्त 15 एकर पर्यंत शेती किंवा बिगर शेती जमीन खरेदी करू शकतात. गुजरात मध्ये फक्त शेती करणारे व्यक्ती शेत जमीन खरेदी करू शकतात. असे विविध नियम राज्यानुसार बदलत जातात.
आता भारतात राहत नसलेले किंवा परदेशातील नागरिक भारतात जमीन खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करू शकत नाही. तसेच त्या व्यक्तींना फार्म हाऊस किंवा वृक्षारोपण मालमत्ता देखील खरेदी करता येत नाही. मात्र वारसा हक्काने जमीन देता येते. असे बरेच नियम जमीन खरेदी विक्री कायद्याअंतर्गत करण्यात आलेले आहे. जमीन खरेदी विक्री कायद्याअंतर्गत जमिनीच्या गुंतवणुकीवर निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहे.
जमीन खरेदी करण्यासाठी सुद्धा मापदंड तयार करण्यात आलेले आहे. कोणत्या व्यक्तीने किती एकर जमीन खरेदी करावी? यासाठी या कायद्याअंतर्गत नियम ठरवण्यात आलेले आहे. जेणेकरून जमिनीवर फक्त एकच व्यक्तीचा भरमसाठ मालकी हक्क न राहता सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा जमीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात यावे, असा उद्देश्य या योजनेचा असू शकतो. राज्यांसोबत संपूर्ण देशांतर्गत हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. बिगर शेत जमिनी बाबत तरी इतके कठीण कायदे लागू झालेले दिसून येत नाही.
हे देखील वाचा-