kusum Solar Yojna कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज करण्यास येत आहे अडचण? असा करा सुधार!

महाराष्ट्रातील बरेच शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यास इच्छुक आहेत. आणि kusum Solar Yojna या योजनेच्या वेबसाइटवरून अर्ज पूर्ण करण्यास प्रयत्न करत आहेत. परंतु 95% शेतकऱ्यांना अर्ज पूर्ण करण्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणून या योजनेचा अर्ज भरताना ज्या शेतकऱ्यांचे 100 रुपये कट होऊन देखील महाऊर्जा करून एम के किंवा रजिस्ट्रेशन नंबर आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या किंवा आपल्या विभागाच्या महाऊर्जा ऑफिसमध्ये जाऊन संपर्क करावा आणि पैसे कट होऊन देखील प्रकिया पूर्ण होत नाही याची कल्पना द्यावी. अशा शेतकऱ्यांना महाऊर्जा ऑफिस मधून त्यांचा एम के नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर काढून देण्यात येईल.


त्याचप्रमाणे अर्ज करताना एकच मोबाईल नंबर दोन गेला रजिस्ट्रेशन साठी वापरू नये. किंवा दोन शेतकऱ्यांनी एकच मोबाईल नंबर वापरू नये. यामुळे रजिस्ट्रेशन साठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सातबारा उतारा, 8 अ उतारा, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक, आधार कार्ड, सातबारा वरती विहीर सामायिक असेल तर सामायिक दाराचे संमती पत्र अशा कागदपत्रांची आवश्यकता असेल.


कुसुम सोलर पंप kusum Solar Yojna योजनेंतर्गत बसविण्यात येणारे सोलर पॅनल नापीक जमिनीवरच बसविण्यात येणार आहेत, जेणेकरून नापीक जमिनीचाही वापर करता येईल आणि नापीक जमिनीतून उत्पन्नही मिळवता येईल. योजनेचा जास्तीत जास्त लाभ अशा राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाईल जेथे कमी पाऊस आहे किंवा जेथे सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही. त्यामुळे kusum Solar Yojna या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. आणि रजिस्ट्रेशन करण्यास अडचण येत असेल तर महाऊर्जा ऑफिस मध्ये जाऊन संपर्क साधा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.