Kusum Solar Pump MEDA कुसुम महाऊर्जा योजनेअंतर्गत वाढणार सौर पंपांचा जिल्हानिहाय कोटा!

Kusum Solar Pump या योजनेअंतर्गत अजून एक आनंदाची आणि फायद्याची बाब आता अशी आहे की या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून जिल्हानिहाय कोट्यात वाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि अनेक शेतकरी यासाठी अर्ज देखील दाखल करत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत जिल्हानिहाय कोटा वाढवून भेटणार आहे.

कोल्हापूर१५८, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड प्रत्येकी १, वर्धा २, सांगली १ हजार ८२०, पालघर ८, पुणे २ हजार ६०२, सातारा १ हजार ३६९, सोलापूर १ हजार ४५०, नागपूर ३०, चंद्रपूर २०, गडचिरोली ५४, भंडारा ४२०, गोंदिया ९४, अमरावती ६१, अकोला २७२, बुलडाणा ७३५, यवतमाळ १ हजार १४०, वाशीम ७७३, नाशिक १ हजार ७६९, नगर १ हजार ४१९, धुळे १ हजार २३३, जळगाव ८९६, नंदुरबार १ हजार ३६, छत्रपती संभाजी नगर ७७९, जालना ९१९, परभणी ७३१, हिंगोली ९०७, लातूर ८२६, नांदेड ९५२, बीड ६९६, धाराशिव ५०० या प्रमाणे जिल्हानिहाय अर्जांची संख्या Kusum Solar Pump या योजनेअंतर्गत आहे.

दिनांक 25 मे 2023 पासून हा नवीन कोटा उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक, सातबारा, पासपोर्ट फोटो, सही किंवा अंगठा, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. कुसुम महाऊर्जा सौर लाभार्थी नोंदणी ही केंद्र सरकारने तयार केलेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेली प्रक्रिया आहे. या कार्यक्रमाचे लाभ घेण्यासाठी, व्यक्तींनी www.mahaurja.com या अधिकृत वेबसाइटवर कुसुम महाऊर्जा नोंदणी फॉर्म २०२३ भरणे आवश्यक आहे. पात्र शेतकर्‍यांना 95% अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जातो, ज्याची किंमत नाही. शासनाचे प्रतिनिधी सौर पंप बसवण्याचे काम पूर्ण करण्यासाठी घटनास्थळी येतात, कारण हा कार्यक्रम महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत येतो. नोंदणी प्रक्रियेनंतर, संपूर्ण योजना महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (MEDA) द्वारे प्रशासित केली जाईल.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.