kadba kutti yojana सध्या राज्यसरकार अतिशय तत्परतेने शेतकऱ्यांच्या हित आणि गरज लक्षात घेऊन त्यांच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवत आहे. फक्त शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीसाठीच नाही तर त्यासोबतच निगडित असलेल्या जोड धंद्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित करून त्यासाठीही योजना राबवत आहे. आता हल्लीच काही महिन्यात शेतकरी आणि पशुपालक यांच्यासाठी क्रेडिट कार्ड योजना तसेच गाई म्हैस गट वाटप योजना तयार करण्यात आल्या पण यासाठीही दूर दृष्टिने विचार करून सरकारने नवीन योजना अमलात आणली आहे ती म्हणजे कडबा कुट्टी मशीन योजना २०२३. अनुदानातून प्राणी विकत घेतल्यानंतरही त्यांना योग्य आणि वेळेवर खाद्य मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील. यासाठी ही नवीन योजना अमलात आणण्यात आली आहे. kadba kutti price
kadbakutti शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी गोरे-ढोरे असतील, त्यांना जनावरांना चारा-पाणी व्यवस्थित करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागते. तुम्हीसुद्धा एक शेतकरी असाल व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्यासाठी शासनाकडून kadbakutti मशीन ही अनुदान तत्वावर देण्यात येणार आहे. जनावरांसाठीचा चारा या मशीनच्या मदतीने जलद गतीने व नासाडी न होता कापता येतो आणि कापणी केल्यामुळे चारा बारीक कापला जातो ज्यामुळे जनावरांना खाण्यास सोपे व सहज होते.
या योजनेसाठी नियम अटी काय? अर्ज कोठे करावा? अनुदान देण्याची पद्धत कशी आहे? त्यासाठी पुढील माहिती वाचा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
कडबा कुट्टी मशीनची किंमत १० हजार ते ४० हजारापर्यंत आहे. शेतकऱ्यांची जनावरांची क्षमता, कडबा कापण्याची गती यानुसार kadbakutti मशीनची किंमत ठरवली जाते. कडबा कुट्टी मशीनमध्ये मानवचलित व स्वयंचलित अशा दोन यंत्राचे प्रकार आहेत. मानवचलित स्वस्त, तर स्वयंचलित kadba kutti machine price कडबा कुट्टी यंत्र महागडे असतात. कडबा कुटी मशीनसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के २० हजार रुपयांच्या kadba cutter मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जातं, तर इतर शेतकऱ्यांना ही अनुदान मर्यादा १६ हजार रुपयापर्यंत आहे.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.